Thursday, March 24, 2011

डोळ्यांची ती अबोल भाषा.......

तेच झाड , तीच सावली , तीच चांदण्यांची रंगावली ,
डोळ्यांची ती अबोल भाषा डोळ्यांनीच जाणली ………
प्रेम नावाच्या वादळात मी उध्वस्त व्हायचं ठरवलं
पण त्या वादळानेच माझं घर सावरलं,
दैनंदिनी प्रेमाची मी हृदयातच लिहिली ,
डोळ्यांची ती अबोल भाषा डोळ्यांनीच जाणली ………
नाकारता ना आले मजला काट्यांतूनहि चालता येते
पहाडाएवढ दु:खसुद्धा हसता हसता पेलता येत,
त्या प्रेमदेवतेच्या अर्चनेस मी जीवनज्योतच अर्पिली,  डोळ्यांची ती अबोल भाषा डोळ्यांनीच जाणली ………
तुझे बोलके डोळे मलाच अबोल करत होते
मी बोलण्याआधीच ते बरच काही सांगून जात होते ,
त्या धारदार नजरेत पाहिली मी रेशमी प्रीतीची लाली ,
डोळ्यांची ती अबोल भाषा डोळ्यांनीच जाणली ………
मिळाला तुझा आसरा म्हणूनच जीवन जगता आलं
दु:खाच्या सावलीतही सुखात रमता आलं ,
तुझ्या कुशीतच निर्धास्त विसावलो मी चांदराती रंगमहाली ,
डोळ्यांची ती अबोल भाषा डोळ्यांनीच जाणली ………
मनामनातून गुंफले होते स्वप्नांचेच धागे
एक पवित्र नाते जुळले होते शब्दांच्याच मागे ,
प्रेमसागरतीरी मी एक स्वप्नील दुनियाच साकारली ,
डोळ्यांची ती अबोल भाषा डोळ्यांनीच जाणली ………

तुझ्या आठवणी…

विसरू कशा मी तुझ्या आठवणी ?
पूर्वजन्माची ती कहाणी |
एक राजा आणि एक राणी ,
गात होते मधुर गाणी ||

एकांकी जीवनात माझ्या अवतरली एक परी ,
घेउनी गेली ती मजला तिच्या स्वप्ननगरी ,
सुखावले नयन पाहून ती सुंदर जादुगरी |
प्रेमात तिच्या मोहरून स्तब्ध झाली  वाणी ,
विसरू कशा मी तुझ्या आठवणी ?……

पण , विघ्न येता ताटातूट झाली ,
सारी मधुर स्वप्ने विखुरली ,
गाठ जन्मभराची क्षणातच सुटली |
वदविता ना आली मजला व्यथा केविलवाणी ,
विसरू कशा मी तुझ्या आठवणी ?……

माहित होते मजला स्वप्नं हे भंगणार ,
काळोख्या आशेतच मला  जन्मभर कोंडून ठेवणार ,
रहस्यमय जीवनाचे हे कोडे कसे उकलणार ?
अक्रोशातच संपणार  हि रात्र जीवघेणी ,
विसरू कशा मी तुझ्या आठवणी ?…….

नंतर नवे मार्ग दिसले , नव्या दिशांनी सावरले ,
स्वर घायाळ  मनाचे दुसरे कुठेतरी गुंजले ,
अंधाऱ्या रहस्याचे उत्तर आता सापडले
आणि सुरु झाली एक नवी कहाणी ,
पण …….विसरू कशा मी तुझ्या आठवणी ?……

तुला आणि फक्त तुलाच ..

परतू नकोस तू पुन्हा
जुन्या आठवणी जागवायला,
आधीच खूप दिवस लागलेत
मनावरील जखमा भरायला….
दुखः अंतरी दाबून
एकांतामध्ये रडत असतो ,
म्हणूनच का कुणास ठाऊक
सर्वांसोबत हसत असतो ……

आयुष्यात पुन्हा परतू नकोस तू
तुझे स्थान मिळवायला
आधीच फार वेळ लागलाय
त्या सर्व आठवणी विसरायला…..
 

Wednesday, March 23, 2011

निर्दयी

तुझ्या शिवाय हे आयुष्य कुठवर होत
माझ सार जिवन तुझ्याच नावावर होत

तु गेलीस तेव्हां घरानेही श्वास रोखलेला
तुझ्या आठवणीचं वादळ माझ्या घरावर होत.

गुदमरत होता बेभान वारा अगंणात माझ्या
कधी तु माळलेल गुलाब त्या दारावर होत.

तो मेघही वेडा आज उगाच बरसुन गेला
आधीच आसंवाच पाणी माझ्या गालावर होत.

असाच कोलमडुन पडला घराचा तो कोनवासा
तुझ्या विरहाच ओझ त्याच्याही मनावर होत.

शेवटी शोधला एक कोपरा निवांत असलेला
तोही ओघळला त्याचही प्रेम तुझ्यावर होत.

मीही कसा जाउ सोडून तो घराचा पसारा सारा
निघालो तर दिसलं तुझच नाव दारावर होत.

कुपणांत म्हणे काल निवडूंग कुजबुजत होता
त्याचही खुप प्रेम त्या निर्दयी अगंणावर होत.

ती आली.

होउन गारवा आयुष्यात ती आली
घेउन सुखांची बरसात ती आली

मी तर पाकळ्यांची आस केली
बनुन सडा पारीजात ती आली

रस्ता चालत होतो काट्यांचा जेव्हां
सोडून तीची पाउलवाट ती आली

बुडता बुडता किनारा गवसला मला
होऊन माझा आधार लाट आली

आसवात होतो कधी मी चिबं भिजलेला
घेऊन मग मेघातुन बरसात ती आली

आजवर या कुट्ट काळोखात जगलो
होउन प्रकाश घरी साजंवात ती आली

आसवात कधी आभाळ पाहील नाही
उधळून चादंण्यात चादंरात ती आली

कोण म्हणे मी भगांर भगांरात जगलो
रगंवुन रांगोळी माझ्या दारात ती आली

हा एक निवडूंग वाळवटांत होता एकटा
होऊन हिरवळ या श्रावणात ती आली.

कस ओळखाव..

कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.

हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.

मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.

कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे.

Monday, March 21, 2011

खरच पहिले प्रेम आयुष्यात मिळते का???

खरच पहिले प्रेम आयुष्यात मिळते का?
जेव्हा होते तेव्हा खरच समजते का???........

होते ते प्रेम कधी बालपणात
तिच्या हसण्यात आणि लाजुन बघण्यात
समज नसते त्या प्रेमाची
त्या आतील नात्यांची
लहानपनी तरी कधी जाणवते का?
खरच पहिले प्रेम आयुष्यात मिळते का?
जेव्हा होते तेव्हा खरच समजते का?.
प्रेमात लोक आंधळी होतात
पण जे प्रेम करतात तेच समजतात
पाहिले प्रेम हे काय आहे
दुधा शिवाय पाण्याला आलेली साय आहे
प्रेम हे वया प्रमाणे बदलते का?
खरच पहिले प्रेम आयुष्यात मिळते का?
जेव्हा होते तेव्हा खरच समजते का?
ज्यांना भेटते ते असतात सुखी
पण न मिळाले म्हणुन रहायचे का दू:खी
हा तर नशिबाचा खेळ आहे
आणि नशिबाने घातलेला मेळ आहे
खरच पहिले प्रेम आयुष्यात मिळते का???
जेव्हा होते तेव्हा खरच समजते का???........
माणसाने आयुष्यात कधी तरी प्रेम करावे
पण ते जर दूर गेले तर आयुष्यभर जपावे..
.
.
.
.
खरचं पाहिले प्रेम आयुष्यात मिळते का???????? पण ते प्रेम आयुष्य भर राहते का???

तू माझ्याशी लग्न करशील....

तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई वडील,
त्याला ही भीक द्यायला तयार होतील,
पण एका भीकार्‍या शी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील...

यदा कदाचित,
तो मुलगा चांगला निघाला तरी..
फक्त जीवनाशी तडजोड म्हणून,
तो लग्नाला होकार देईल..
तुझे पालक ही त्याचे रूप आणि
मुखय म्हणजे किती हजारांची नोकरी आहे,
हे पाहून लग्नास मान्यता देतील.

पण जीवनाशी तडजोड करणार्‍या श्रीमनताशी,
काय तू जीवनभराच नात जोडशिल..अग
एका हृदयाने भिकारी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील.....

तो तुला बायको म्हणून घरात ठेवेल..
तू माझ्या हृदयात राहशील..
तो तुझ्या भावनाना समजावून घेण्याचा प्रयत्न करेल..
मी त्याच भावनांशी माझे नाते जोडेल..

हृदयतून निघालेल्या माझ्या या शब्दांवर,
मला माहीत आहे तू नक्कीच हसशील..
तरी पण..........एका अनोळखी मूलाशी लग्न करण्या पेक्षा,
तू माझ्याशी लग्न करशील....

काय हरकत आहे....

 
माझी स्वप्न माझी आहेत
माझे रंग माझे आहेत
माझं प्रेम माझं आहे
मग काय हरकत आहे?

माझी तुझ्यावर बंधन नाहीत
तुला “तशी” स्पंदनं ही नाही
तुला माझा त्रास ही नाही
की मझ्या प्रेमाचा जाच ही नाही
तरी..

तू प्रेम केल नाही
तरी मी प्रेम करते ना
कुणासमोर नाही तरी
आतल्या आत झुरते ना
काय हरकत आहे?

हरकत असून तरी काय होणार आहे?
बंधन घातलीत मनाला
तरी किती पाळल्या जाणार आहेत?
मग का बंधून ठेवायच?
प्रेम करणारच ना बांधुन देखील
मग मुक्त पणे करायचं
काय हरकत आहे?

राहून गेलंय आपलं नातं!

तुझ हसणं आठवलं
तसे टपटपले दोन-चार शब्द कागदावर
तुझ चिडणं आठवलं
तश्या उमटून गेल्या दोन-चार ओळी
मलाही मग आला उत्साह
आठवत गेलो तुला खूप खूप...
तसे तरंगत आले चुकार शब्द
आणि बसले शहाण्यासारखे
एकेका ओळीत गुपचूप...

मग मी आठवल्या त्या कातरवेळा
ती संकेतस्थळं आणि ती चांदरात...
तसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनी
लपेटले स्वत:ला वृत्त, लयी आणि यमकांत...
कागद भरुन गेला पार...
छान कविता होत होती तयार...
आता शेवटच राहिला होता फक्त
बाकी सगळं जमलं होतं मस्त
अन मला कुठुनसं आठवलं
आपलं झालेलं भांडण
तुझ्यासारखेच रुसून बसले मग शब्द
परत थोडा मागे गेलो
जुनं-जुनं आठवू लागलो

हाताला लागले काही निसटणारे क्षण
लिहिलंही मी कागदावर काहीबाही
पण ते माझं मलाच पटलं नाही...
जसं आपलं भांडण
कधी कध्धीच मिटलं नाही...
माझं मीच मग समजावलं मला
कधी कधी असं होतं
राहते एखादी कविता 'अपूर्ण'च
जसं राहून गेलंय आपलं नातं
जसं... राहून गेलंय आपलं नातं!

एवढे तुझे नशीब नाही.....

तुला तुझी चुक कलावि.... एवढे तुझे नशीब नाही.....
प्रत्येक गोष्ट मी आजकाल
नशिबावर नेत नाही...
कारण माझे नशीब तुझ्यासारखे
वेळेवर कधी साथ देत नाही...
...
दोन अश्रु तेव्हा मी ओघळले असते
माझे प्रेम तुलाही कळले असते....
पण दानात मिळेल ते प्रेम कसले
म्हणुन माझे अश्रु माझ्या डोल्यातच सुकले......

Sunday, March 20, 2011

फक्त तुझ्यासाठी …


तुझ्या इच्छेसाठी
तुटलाय ग तो तारा
तुझ्या सोयीसाठी
सुटलाय ग हा वारा
तुझ्या आनंदासाठी
चांदण्याचा हा पिसारा
तुझ्या झोपेसाठी
चंद्र जागतो आहे बिचारा
तुझ्याचसाठी
खेळ मांडला हा सारा
फक्त तुझ्यासाठी …

Saturday, March 19, 2011

आहे बरेच काही सांगायला मला.


उगाचच...

एकदा कधी चुकतात माणसं,
सारंच श्रेय हुकतात माणसं...

प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं,
सावकाश हे शिकतात माणसं...

गंधासाठी दररोज कोवळ्या,
कितीक फुलांस विकतात माणसं

शतकानुशतके कुठलीशी आस,
जपून मनात थकतात माणसं...

जुनाट जखमा भरू लागल्या की,
नवीन सिगार फुकतात माणसं...

हरेक पाकळी गळुनिया जाते
अन अखेरीस सुकतात माणसं...

नको रे असं कडू बोलू 'सोनू '..
उगाचच किती दुखतात माणसं !!! 

आयुष्य म्हणजे

आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं
आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं
आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं
आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं
पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

Friday, March 18, 2011

खर्या प्रेमाचा हृदयस्पर्शी शेवट

एकदा एक मुलगा त्याच्या प्रेयसीला challenge करतो कि एक पूर्ण दिवस तू माझ्याशिवाय राहून दाखवायचे, मला फोन, मैल, मेसेज काहीही करायचे नाही .जर तू अस करून दाखविलेस तर मी तुझ्याशी लगेच लग्न करेन .मुलगी म्हणाली खरे तर मला एक क्षण सुद्धा तुझ्या शिवाय राहायचे नाहीय पण तरीही आज तू मला challenge केले आहेस म्हणून मी एक पूर्ण दिवस काहीही contact न करण्याचे challenge स्वीकारत आहे.एक पूर्ण दिवस काहीही contact न करता जातो दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी  ती मुलगी खूप उत्सुकतेने त्या मुलाला भेटायला त्याच्या घरी जाते पण घरात पोचताच ती तिच्या प्रियकराची पांढर्या शुभ्र कापडात ठेवलेली  व वरती हार घातलेली  body बघते आणि तिला एकदम खूप मोठा धक्का बसत तिला हे अस कस झाले ? , का झाले काहीच कळत नव्हते.रडावे तर अश्रूंचा पूर येईल, शांत तर राहातच येत नव्हते .. कंठ दाटून आलेला ......सर्व आठवणी डोळ्यासमोर एक क्षणात उभ्या राहिल्य  तेव्हड्यात त्याच्या आईने त्याने तिच्यासाठी  लिहिलेली चिठी तिच्याकडे दिली त्यात लिहिले होते , " कर्करोगाच्या आजरामुळे माझ्या कडे शेवटचा एकच दिवस राहिला होता म्हणून मला तुला challenge करावे लागल आणि तू ते करून दाखविलेस baby , आता फक्त हेच तुला रोज करायचे आहे ...............

आयुष्य साधेपणे जगत गेला ...!!

तो आयुष्य अगदी  साधेपणे जगत गेला 
चारआणे खर्च नको म्हणून नुसता  चालत राहिला 

स्वताच्या पोटाला चिमटा घेत ह्याचे त्याचे करीत गेलां 
मध्यम वर्गातला असा शिक्का स्वताच मारून घेतला 
शेव-पुरी पाणी पुरी घरीच करून खायचे 
 काटकसर करून  करून  आयुष्य जगायचे 
 
 
लग्न झाले बायको पण अशीच गरीब घरची 
हनिमूनला न जाता घरीच गात बसली  
डोहाळे डोहाळे लागले फक्त कुरमुरे खाण्याचे 
स्वप्न त्याना कधी पडायचे एकादशीचे 
   
खरे म्हणजे बर्यापैकी पगार होता त्याचा 
पगार झाला म्हणजे घरी पेढे आणायचा 
देवापुढे ठेऊन घरी प्रसाद वाटायचा 
कधीतरी चार आण्याचा  गजरा आणायचा 
  
नवरा मात्र उदार असे वाटून ती सुखावून जायची 
चालण्यासारखा  व्यायाम नाही, असे दोघे  म्हणायची 
भर उन्हात सुद्धा दोघे  चालत घरी यायचे  
थंड थंड माठ्तले पाणी पिऊन दोघे तृप्त व्हायचे 

काळ गेला वेळ  गेली , कळले देखील  नाही 
वय झाले कसे गेले कळले सुद्धा नाही  
एके दिशी छातीत कळ नि अचानक तो गेला 
घरासाठी  मात्र खूप ठेऊन काही गेला 

   
तो आयुष्य अगदी  साधेपणे जगत गेला 
चारआणे खर्च नको म्हणून नुसता  चालत राहिला

नवीन गाठ

"निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जाते, प्रश्न कळत नाहीत आणि उत्तर चुकत जाते,वाटतं सुटत गेला गुंता,पण प्रत्येक वेळी नवीन गाठ बनत जाते"
असं.. कधी वाटलंच नव्हतं..??

जीवनातून तू.. एवढं सहज दूर जाशील..

अनोळखी नजरेनं अशा.. माझ्याकडे पाहशील..

पाहून नंतर.. हळूच मनाशी हसशील..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..
सुहास पवार (सोनू ) .........................................


मनाच्या बागेत, भावनेचं रोपटं..

एवढ्या खोलवर जाईल..

मुळापासून उखडलं तरी..

थोडी आठवण शिल्लक राहील..

ती आठवण सुद्धा वेदनाच देईल..

असं.. कधी वाटलंच नव्हतं..