Thursday, November 17, 2011

जेव्हा मी मरेन

सुहास पवार
जेव्हा मी मरेन, तू आश्रू वाहशील
पण मला कळणार नाही, म्हणून आता वाहूदे तुझे आश्रू माझ्यासाठी

जेव्हा मी मरेन, तू फुले वाहशील
पण मला दिसणार नाही, म्हणून आता पाठव फुले माझ्यासाठी

जेव्हा मी मरेन, तू माझी स्तुती करशील पण मी ऐकू शकणार नाही, म्हणून आता दोन शब्द स्तुतीचे बोल माझ्यासाठी

जेव्हा मी मरेन, तू माझ्या चुका विसरशील
पण मला कळणार नाही, म्हणून आता विसर त्यांना माझ्यासाठी 
  ♥ Live life today ..... Kya pata Kal Ho na Ho !!! ♥
 
 

Wednesday, November 16, 2011

का तीने मैत्री केली..

का तीने मैत्री केली..
ती वादळा सारखी आली..
आणि डोळ्यात पाणी ठेऊन गेली..
एकट्याला सोडून जाण्यासाठी का..?
का तीने मैत्री केली..
तीचे येनं मला कळले नाही..
तीचं जानं मला कळले नाही..
शुद्धीवर आलो तेव्हा कळले..
माझ्याकडे काहीच उरले नाही..
तीच्या साठी झुरायचं..
तीच्या साठी मरायचं..
का असं होतंय..
शेवटी आपणचं आपलं उरायचं..
तीच्या साठी पाहिलेले स्वप्न..
तीच्यावर ठेवलेला विश्वास..
ती सहज तोडून गेली..
एकट्याला सोडून जाण्यासाठी..?
का तीने मैत्री केली..

आयुष्य जास्त सुंदर वाटत..

चारचौघात एकट बसण्यापेक्षा
कधीकधी समुद्रकिनाऱ्यावर
आठवणींना घेऊन बसावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

... ... आपल्याला कोण हवंय
यापेक्षा आपण कोणाला हवंय
हेसुद्धा कधीतरी पहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत..

आकाशातलेतारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत
शक्यतेवढे तारे मोजून समाधानी रहावं
आयुष्य जास्त सुंदर वाटत....

माझा एकांत आणि मी

आजकाल इथं
आम्ही दोघंच असतो..
माझा एकांत आणि मी.
आजकाल तसं दुस-या कुणाशी
फारसं पटत नाही..
... तासन तास दोघं बोलत बसतो,
निश्चल अंधाराच्या काठाशी,
कधी मनात जपलेल्या वाटांशी..

पहाटे.. किरकिरं घड्याळ
तुझी स्वप्नं गढूळ करतं,
माझ्यासारखाच तेव्हा तोही चिडतो.
मग मी घड्याळाला गप्प करतो.
‘आता स्वप्नांतही भेटणं नाही’,
असंच काहीसं बडबडतो...
आजकाल इथं
आम्ही दोघंच असतो..

खिडकीचा पदर बाजूला सारतो,
तिच्या डोळ्यांतलं चांदणं हसतं…
तेव्हा त्याला मी हळूच सांगतो
की ‘तिच्या’ डोळ्यांतही
असंच काहीतरी असतं.
तुझ्या डोळ्यांत हरवलेल्या मला
तो पुन्हा मागे खेचतो..
मी पापण्यांतले थेंब वेचतो..
आजकाल इथं
आम्ही दोघंच असतो..आजकाल इथं
आम्ही दोघंच असतो..
माझा एकांत आणि मी.
आजकाल तसं दुस-या कुणाशी
फारसं पटत नाही..
... तासन तास दोघं बोलत बसतो,
निश्चल अंधाराच्या काठाशी,
कधी मनात जपलेल्या वाटांशी..

पहाटे.. किरकिरं घड्याळ
तुझी स्वप्नं गढूळ करतं,
माझ्यासारखाच तेव्हा तोही चिडतो.
मग मी घड्याळाला गप्प करतो.
‘आता स्वप्नांतही भेटणं नाही’,
असंच काहीसं बडबडतो...
आजकाल इथं
आम्ही दोघंच असतो..

खिडकीचा पदर बाजूला सारतो,
तिच्या डोळ्यांतलं चांदणं हसतं…
तेव्हा त्याला मी हळूच सांगतो
की ‘तिच्या’ डोळ्यांतही
असंच काहीतरी असतं.
तुझ्या डोळ्यांत हरवलेल्या मला
तो पुन्हा मागे खेचतो..
मी पापण्यांतले थेंब वेचतो..
आजकाल इथं
आम्ही दोघंच असतो..

तर कदाचीत कधी...

'' सखे तुझी आठवण अश्रु आणतात ''
वेदना फक्त ह्रृदयाचा आधार
घेऊन सामावल्या असत्या

तर कदाचीत कधी
ङोळेभरून येण्याची वेळ
... आलीच नसती

शब्दांचा आधार घेऊन जर
दूखः व्यक्त करता आले असते

तर कदाचीत कधी "अश्रूंची"
गरज भासलीच नसती

'' सखे तुझी आठवण अश्रु आणतात ''

तुही माझ्या प्रेमात पडताना असं काही पडावं,

स्वप्नातल्या स्वप्नातही तुला फक्त

माझंच स्वप्न पडावं,
...
गर्दीतही तूला माझ्याविना एकटेपणाने छळावं,

तुही माझ्यासाठी कधीतरी.....खूप खूप रडावं. ♥

कधीतरी तुही माझ्यासाठी कवी बनावं
पण नेमकं तेव्हाच शब्दांनी कमी पडावं,
कंटाळून शेवटी तू माझं चित्र रेखाटावं,
पूर्ण होऊनही चित्र...तुला ते अर्धवटच वाटावं.. ♥

मरणही असं..... तुज्या मिठीत यावं,
कि मरणानंतर हि ते मरण मला याद रहावं,
सगळं आयुष्य माझं तू सुखानं असं भरावं,
कि दु:खाला पण माज्या आयुष्यात येताना कोडं पडावं.

Tuesday, November 15, 2011

तुझ्या मैत्री खातर........

हाकेला तुझ्या मी साद देईन,
मैत्रीला आपल्या आवाज देईन,
असलो सात समुद्र पार तरीही,
आपल्या मैत्रीसाठी मी धावत येईन...
आणि...
आणि जर असलो त्या देवा कडे,
तर मित्र,
तुझ्या मैत्री खातर ,
मी त्या देवाशी हि भांडून येईन...
मी त्या देवाशी हि भांडून येईन...

क्षणभर विश्रांती

छोट्या छोट्या गोष्टीतून
आयुष्य घडत असतं
अनेक आठवणींच्या मृगजळात
मन अडकून बसतं

क्षणभर विश्रांती चाचपताना
थोडीशी धाप लागते खरी...
पण... अनंताचा उगम शोधणाऱ्याला
मिळेल तरी कसा श्री हरी...??

सरळ साधा सोप्पा प्रश्न
सतत सतावत असतो
बऱ्याचदा पंचांग चाळूनही
ज्योतिष स्वतःचा भाग्योदय का चुकतो..??

देव म्हणजे नक्की असतं काय..??
स्वतः मधल्या विश्वासच मूर्त असं रूप
कि ....असं अजाणत कोडं
ज्याची उकल आहे कठीण खूप

फरक फरक तो काय म्हणायचा,
जाळण्यात आणि पुरण्यात
दोन्ही वेळी थांबतो तो श्वासच
ईश्वर तोलतो फक्त पाप आणि पुण्यात

माणूस म्हणून जन्मलो
त्यात काय मोठेपण
माणुसकी धरून वागलो
कमावले देवपण

हरिनामाच्या चिपळ्या बरोबर
स्वकर्तुत्वाचा गजर करायला हवं
ज्ञानेश्वरांनी ही भोगलं सार..
तिथे आपल्यालाही थोड धीर धरायला हवं

खड्डयात पडण काही गैर नव्हत
फक्त.... निर्धाराने फक्त उभं रहायची जिद्द हवी
रस्ता तर ठेचाळणारा असणारच
पण... पहिलं पाऊल टाकायची उमेद हरलेल्या मनात हवी

सुहास पवार.......

आज मी तिला,
माझ्या facebook account मधून unfriend केले...

आठवणींना तिझ्या,
मनी कुठे तरी save केले...

रडू लागले जेव्हा,
कधी हे मन माझे...
त्या आठवणीन वर double click करून,
मी फक्त त्यांना play केले ...

अन,
रडून झाल्यावर,
शांत पणे मी डोळे मिटले...

पुडे काय करेन,
ते मला माहित नाही...

पण,
आजवर तर मी हेच केले....
आजवर तर मी हेच केले....

...सुहास पवार.......

break up नंतर,
मी घेतलेला सगळ्या चुकीचा निर्णय हा होता....

कुणाच्या इतक्याही जवळ जाउ नये.

कुणाच्या इतक्याही जवळ जाउ नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडताना असहय यातना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकेही येउ नये
की पानाना ते नाव जड जावे
एक िदवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बन्द व्हावे

स्वप्नात कुणाला असेही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहीच नसावे

कुणाला इतकाही वळे देउ नये
की आपल्या क्श्णाक्शणावर त्याचा हक्क असावा
एक दिवस आरश्यासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाचे इतकेही ऐकु नये
की कानात फ़क्त त्याचेच शब्द घुमावेत
आपल्या ओठातुनही मग
त्याच्याच शब्दान्च उच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असु नये
की प्रत्येक स्पनदनात ती जाणववी
ती साथ गमावण्याच्या भीतीने
डो्ळयात खळकन अश्रु जमावी

कुणाला इतकाही माज़ा म्हणु नये
की त्याचे 'मी पण' आपण वीसरुन जावे
त्या सम्भ्रमतुन त्याने आपल्याला
ठेच देउन जागे करावे

पण, पण
कुणाच्या इतक्याही दुर जाउ नये
की आपल्या सावलीशिवाय सोबत काहीच नसावे
दूर दूर आवाज िदला तरी
आपले शब्द जगीच घुमावे .............!

माझी आठवण कर........मी येईल....नक्की येईल....

जेव्हा काही चुकत असेल.....तेव्हा माझी आठवण कर......
तुला आठवेल बरोबर असलेल....
जेव्हा कधी संकटात असेल.........तेव्हा माझी आठवण कर........
तुझ्या मनात असेल तुला सावरायला.....
जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असेल.....तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल वार्याची झुळूक बनून तुझे अश्रू पुसायला..........
जेव्हा तू झोपला असेल.........तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल जवळ तुझ्या तुला निजवायला.........
जेव्हा तू एकटा असशील तेव्हा माझी आठवण कर........
मी येईल तुझ्या एकांतात तुझ्याशी गप्पा मारायला.........
जेव्हा तू मला आठवशील तेव्हा माझी आठवण कर.......
मी येईल एक आठवण बनून तुझ्या आठवणीत रमायला......
कारण प्रत्यक्षात तर मी येऊ शकत नाही.....
माझ तस अस्तिव हि नाही......
पण जेव्हाही तुला माझी गरज लागेल....
तेव्हा माझी आठवण कर........मी येईल....नक्की येईल....
तुझे अश्रू बनून......
तुझ्या वेदना घालवायला......

माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे

एवढे एक करशील ना ? शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना ? अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना ? माझ्याही नकळत दुखावले तुला तर माफ़ मला करशील ना ? ओघळले अश्रु माझे तर अलगद टिपून घेशील ना ? आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना ? सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना ? चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना ? हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना ? कितीही भांडलो आपण तरीही समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ? मी आता विसरणे शक्य नाही तुला तू मला लक्षात ठेवशील ना ? जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ? मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना ? आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो, पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ? तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो तरी माझ्यासाठी.......... तूच एक असशील ना ?

जेव्हा तू पण कुणाच्या खऱ्या प्रेमात पडशील...

""माझे खरे प्रेम तिला कधी कळलेच नाही"" !!!!!!!!!!!!!!!!!!!!!

"रोज सकाळी अंघोळ केल्यावर पूजा करतो,
न चुकता तुझ्यासाठी काहीतरी मागत असतो,
एकदा देव म्हणाला कधी तरी चुकून स्वतः साठीपण मागत जा,
त्याला म्हटले तीच्याशिवाय माझे आयुष्य तरी आहे का रे?
मला झोपायला जमीन दिलीस तरी चालेल .... पण तीला तू मखमली पलंग दे,
मला दिवसभराची भूक दिलीस तरी चालेल ... पण तीला तू दरवेळी १२ पक्वान्न दे,
मला तू भले अंधारात ठेव पण तीच्यासाठी ... न विझणारी तू प्रकाशाची ज्योत दे ,
माझ्या वाटेला दुखाश्रू आले तरी चालेल ... पण तीला नेहमी आनंदात ठेव,
माझ्यातला जीव घेतलास तरी चालेल ... पण तीच्या हृदयात माझे स्थान असच ठेव,
माझे मागणे ऐकून देवपण थक्क झाला,
कधी न रडणाऱ्या देवाचा डोळा पण तेव्हा पाणावला,
का करतोस इतके प्रेम तीच्यावर जीने प्रेम तुझे स्वीकारले नाही,
का मरतोस तीच्यासाठी जीने जगणे तुझे मान्य केले नाही.
मी म्हटलो सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुला भेटतील ,
जेव्हा तू पण कुणाच्या खऱ्या प्रेमात पडशील... "

तुजविना मी कसा जगणार ?

बंध आहेत हे प्रेमाचे
तोडता नाही तुटणार
नाही तुटणार ही प्रेमाची नाती
आठवणीचे वारे ही वाहणार
सांग तुच आता
एकमेँकाशिवाय आपण कसे जगणार
कोमल अशा तुझ्या कळीला
कधीच नाही कोमजु देणार
अश्रुंशी नाते जोडलेस तरी
अश्रुंसाठी तुला पारखे करणार
करु शकलो नाही असे तर सांग तुच
एकमेँकाशिवाय आपण कसे जगणार
जरी वाळवंटात सापडलीस तु
मी तुझ्या सोबतीला असणार
शब्दात माझ्या अडकलीश तु
तर वेदना ह्या मलाच होणार
असं असताना तुच सांग
एकमेंकाशिवाय आपण कसे जगणार
का बंध टाकु मी माझ्या जीवनावर
मी यात वाहवतच जाणार
लढेन मी तुझ्या सुखासाठी
नाही लढलो तर मी या जगातच नसणार
कविता नाही हे जीवन आहे माझे
अखेरच्या श्वासापर्यत अंत नाही होऊ देणार
असं असताना तुच सांग
एकमेंकाशिवाय आपण कसे जगणार
तुजविना मी कसा जगणार ?

कारण तस प्रेम तू कधी केलाच नाही

मला आठवतंय तुझ माझ्याशी बोलन
काय बोलतो तिथे लक्ष न देता तुझ्यात गुंग होण
मला आठवतंयतुझ मला पागल म्हणन
मग मी खोट खोट तुझ्यावर रागवण
मला आठवतंय तुझ मला लाडान बोलन
हे ऐकताना नव्यान तुझ्या प्रेमात पडण
मला आठवतंय तुझ माझ्यावर प्रेम करण
प्रत्येक वेळेस माझ त्या प्रेमास जगन
मला आठवतंय तुझ माझ्यावरच चिडण
तुझा राग जावा म्हणून माझा हि धड्पद्न
मला आठवतंय तुझ मला टाळण
अस वागताना तुझ .माझ वेड्यागत होण
मला आठवतंय माझ्यावर प्रेम नाही अस तुझ बोलन
अन माझ ते कठोर मनान स्विकारण
मला आठवतंय तुझ माझ्याशी खर बोलन
म्हणून तर तुझ्यावरच माझ प्रेम पुन्हा पुन्हा गाढ होण
मला आठवतंय तुझ्याशी बोलण्यासाठी
माझ तडपण.नेमक तुला त्या गोष्टीचा त्रास होण
मला आठवतंय तुझ्या सोबतच चा प्रत्येक क्षण
अन फक्त तुझ्यात .गुंतलेल ते माझ मन
पण.......
तुला आठवत का रेमाझ तुझ्यासाठीच जगन
कुठलीही अपेक्षा न करता फक्त तुझी वाट बघन
तुला आठवत का रे एकदा तरी तुझ मला आठवण
मी काढलेल्या आठवणी मुळे सतत तुला उचकीच लागण
मला सार आठवत पण तुला आठवत कि नाही माहित नाही
कारण तस प्रेम तू कधी केलाच नाही
कारण तस प्रेम तू कधी केलाच नाही ..!!!!!

I Miss you"

कोणत्याही अडचणीच्या वेळेला, मी म्हणणार नाही तुला see you
नेहमी राहुयात एकत्र, Me & you
जर उद्या मी ह्या जगात नसेन, तर ठेवून फुल माझ्या प्रेतावर
फक्त एकदा म्हण Stupid I Miss you" ♥

तू येशील

कॉलेज मध्ये असताना गुलाबाचं फुल तू झाडावरून तोडलंस पण ते कुठेच न वापरता पुस्तका मध्ये ठेवून दिलंस, पुढे ते फुल तसंच पुस्तकामध्ये राहून गेलं ...........
त्याचवेळी माझ हृदय पण तू तोडलंस, ........... आणि ते देखील कुठेही न वापरता असंच पडून राहिलं ..... !!! :(
आज, वर्षानुवर्षे पुस्तकामध्ये ठेवलेला पण सुकून व कोमेजून गेलेला तो "गुलाब आणि मी" ह्यांमध्ये काहीही फरक राहिलेला नाहीये ................. आमच्या दोघांमधला सुगंध आता निघून गेला आहे पण दोघांच आस्तित्व मात्र अजूनही तुझ्या आयुष्यात एकाच छोट्या अपेक्षेने असंच पडून राहिलं आहे .......... तू येशील आणि पुस्तकाची (आयुष्याची) पाने चाळून बघशील !!!

Tuesday, November 8, 2011

जेव्हा तू पण कुणाच्या खर्या प्रेमात

रोज सकाळी अंघोळ केल्यावर पूजा करतो,
न चुकता तुझ्यासाठी काहीतरी मागत असतो,
एकदा देव म्हणाला कधी तरी चुकून स्वतासाठीपण मागत जा रे,
त्याला म्हटले तिच्याशिवाय माझे आयुष्य तरी आहे का रे?

मला झोपायला जमीन दिलीस तरी चालेल .... पण तिला तू मखमली पलंग दे,
मला दिवसभराची भूक दिलीस तरी चालेल ... पण तिला तू दरवेळी १२ पक्वान्न दे,
मला तू भले अंधारात ठेव पण तिच्यासाठी ... न विझणारी तू प्रकाशाची ज्योत दे ,
माझ्या वाटेला दुखाश्रू आले तरी चालेल ... पण तिला नेहमी आनंदात ठेव,
माझ्यातला जीव घेतलास तरी चालेल ... पण तिच्या हृदयात माझे स्थान असाच ठेव,

माझे मागणे ऐकून देवपण थक्क झाला,
कधी न रडणाऱ्या देवाचा डोळा पण तेव्हा पानावला,
का करतोस इतके प्रेम तिच्यावर जिने प्रेम तुझे स्वीकारले नाही,




का मरतोय तिच्यासाठी जिने जगणे तुझे मान्य केले नाही,

मी म्हटले सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुला भेटतील ,
जेव्हा तू पण कुणाच्या खर्या प्रेमात पडशील... "

Wednesday, October 12, 2011

एक छोटीशी प्रेमकथा

एक छोटीशी प्रेमकथा

१५ वर्षापूर्वीची गोष्ट असेल. मी त्यावेळेला शाळेत होतो. शाळा सुटली की माझा क्लास असायाचा. शाळा सकाळची होती ७ ते १२ वाजेपर्यंत आणि क्लास ३ ते ५ वाजेपर्यंत. क्लास मधे माझ्या बाजूला एक देखणा मुलगा बसायचा. पहिल्या दिवसापासून तो माझ्या बाजूला बसत होता आणि चांगला मित्र पण झाला होता. आपण त्याला ह्या गोष्टी चा राजा म्हणुया. आमच्या क्लास मधे आमच्या शाळेशिवाय ईतर मुले मुली पण असायचे. राजा पण दुसर्‍या शाळेतला होता. आम्ही क्लास मध्येच एकत्र भेटायचो. एकदम मनमोकळा स्वभावाचा. नेहमी हसरा चेहरा. एक साइड चा भांग पाडला कि दिसायला विनोद खन्ना होता. घरची परिस्थिती पण चांगली होते. त्यावेळेला सुद्धा आम्हा सर्वाना वडापाव, चॉकलेट घ्यायची त्याची ऐपत असायची. आमच्या खिशात त्यावेळेला चुकून माकून एखादे चार आणे मिळाले तर नशीब. पॉकेटमनी हा प्रकारच अस्तित्वात नव्ह्ता. पहिल्या दिवशी क्लास मधे आल्यापासून तो माझा चांगला मित्र झाला. क्लास सुटल्यावर पण आम्ही खूप धमाल करू. त्यावेळेला त्याच्या कडे सायकल होती. त्यावेळेला सायकल असणे म्हणजे आता कॉलेजात जाणार्‍या मुलाकडे मर्सिडीज असण्यासारखे होते. आम्ही डबल सीट बसायचो, अर्थात सायकल तोच चालवायचा. मला घराच्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि निघून जायचा.

आमच्या क्लास मधे एक सुंदर मुलगी पण होती. लांबसडक पाठीवर रुळणारे केस, गोरीपान काया, अंगाने नाजुक शिडशिडित बांध्याची, पाणीदार डोळ्यांची. हिच ह्या कथेची “राणी”. हा राजा आणि राणी एकाच शाळेत आणि एकाच वर्गात पण होते. दोघे राहायला पण बाजूबाजूच्या सोसायटी मधे होते. राजा च्या बिल्डिंग च्या बाजुने पोलिस वसाहत चालु होत होती. तिचे वडिल पोलिस खात्यात कामाला होते. चांगल्या वरच्या पोस्ट वर होते त्यामुळे त्यांना जरा बर्‍यापैकी बिल्डिंग मध्ये रहायला मिळाले होते. राजा मुळे माझी आणि तिची ओळख झाली. मी, राजा, राणी आणि तिच्या दोन मैत्रीणी असा आमचा चांगला ग्रुप तयार झाला होता. इतर कोणाला आम्ही ग्रुप मधे घेतलेच नाही. क्लास सुरू व्हायच्या आधी आणि सुटल्या नंतर आम्ही क्लासच्या बाहेरच्या कठ्ठ्यावर गप्पा मारता बसायचो. एक गोष्ट आमच्या नजरेतुन सुटत नव्हती ती म्हणजे राजा चे राणी कडे बघणे आणि राणी ने त्याला प्रतिसाद देणे. त्यावेळचे प्रेम आता सारखे फास्ट फॉरवर्ड नव्हते. त्यावेळेला नजरेवरच सगळी भिस्त असायची. मेसेजेस पोचवायला एक तर मित्र मैत्रिणी नाही तर लायब्ररीची पुस्तके. मोबाईल काय असते हे तर दूरदूर पर्यंत माहित नव्हते. घरात एखाद्याच्याच घरी एमटीएनल चा फोन असायचा आणि पूर्ण चाळी ची भिस्त त्या नंबर वर असायची. फ्रेंडशिप डे, वॅलेन्टाईन डे वगैरे गोष्टी अजुन सातासमुद्रापारच होत्या. त्यामुळे एखादी मुली बरोबर मैत्री करायची असेल तर डेरिंग करण्याशिवाय पर्याय नसायचा अन्यथा मुलगी डेरिंग करून रक्षा बंधन ला राखी बांधायला यायची.

तर अश्या जमान्यात राजा आणि राणी च्या कच्च्या प्रेमाचे अंकुर फुटत होते. गप्पा मारताना हळूच एकमेकांकडे बघुन हसणे, डोळ्यांच्या खाणाखूणा होणे, गप्पा मारताना दोघांचे एका विषयावर एकमत होणे आणि उस्फुर्तपणे टाळी देणे, टाळी दिल्यावर रानीचे हळूच लाजून मान खाली घालणे, क्लास मधे आल्यावर पहिले एकमेकांना शोधणे आणि नेहमीच्या जागेवर दिसले नाही तर चेहर्‍यावर चलबिचल होणे. कधी राजा उशिरा आला की रानीचे क्लास च्या दरवाज्याकडे एकटक बघत वाट पहाणे आणि राजाने आत प्रवेश केला की दोघांची नजरानजर होणे, मग राजा आत येऊन जागेवर बसे पर्यंत राणी त्याच्याकडे पाहत राहायची. एकदा राजा बसला की मग तो राणी कडे पाहायचा. मग राणी खुणेनेच विचारायची, ‘ का रे? एवढा उशीर का झाला?’ राजा मग मान हलवून डोळ्याच्या पापण्याची उघडझाप करून सांगायचा, ‘ काही नाही ग! असचं !”. मग क्लास चालू असताना एकमेकांकडे लक्ष नसताना बघणे आणि चुकूनमाकून नजरानजर झाल्यावर माना खाली घालून हसणे. हे लगेच आम्हाला समजून येऊ लागले होते. पण कोणी च काही बोलता नव्हते. आम्हां सगळ्यांना त्यांची जोडी आवडत होती पण जो पर्यंत त्यांच्या मनातले समजत नव्हते तो पर्यंत आम्हाला पुढाकारही घेता येत नव्हता.

तरी आम्ही त्यांना सपोर्ट करायला कधीच सुरुवात केली होती. ग्रुप मधे बसलो असताना आम्ही खास करून दोघांना एकमेकांच्या बाजूला बसायला जागा द्यायचो. तेव्हा राजाच्या होणार्‍या ओझारत्या स्पर्शाने राणी ची कळी खुलायची आणि तिचे गोरे गाल लाल टमाटर सारखे होऊन जायचे. तर तिचे लाजणे बघुना राजा ची स्वारी एकदम खुष होऊन जायची. क्लास सुटल्यावर आम्ही सगळे जण राणी च्या घरापर्यंत चालत जायचो. एक एक मैत्रिणी ला सोडत सर्वात शेवटी राणी चे घर यायचे. मुद्दाम आम्ही मोठा वळसा घालून तिच्या बिल्डिंग पर्यंत पोहचायचो. एकदा का मैत्रीणी गेल्या की मग राजा आणि राणीच चालायचे. मी राजाची सायकल घेऊन बाजूने चालायचो. जेणे करुन दोघांना एकांत मिळावा पण एवढे पण बाजूला नाही चालायचो की जेणे करून इतर लोकांना संशय येईल. चालताना एकमेकां कडे बघणे, गप्पा मारताना ओठांपेक्षा डोळ्यांनी जास्त बोलणे हे सारे आम्हांला समजू लागले होते. त्यांना वाटायचे आम्हाला कोणी बघितलेच नाही आणि आम्ही ही त्यांना तसे कधी जाणवू दिले नाही. राणीला घरी सोडल्यावर राजा मला डबल सीट घेऊन माझ्या बिल्डिंग च्या मागच्या गल्लीत सोडायचा आणि मग निघून जायचा.

आमच्या नजरे समोर त्यांचा प्रेमाचा वृक्ष बहरू लागला होता. पण दोघांनी एकमेकांना अजूनही मागणी घातली नव्हती की एकमेकांच्या निदर्शनासही आणून दिले नव्हते. एके दिवशी आम्ही राणी ला तिच्या बिल्डिंग जवळ सोडून माझ्या घरी परतत होतो तेव्हा राजाने न राहवून मला विचारले, ‘ अरे यार ! आज काल मला कसे तरीच होते आहे. राणी ला घरी सोडले की जिव कासावीस होऊन जातो रे. रात्री पण तिची खूप आठवण येते. मग तिच्या दिलेल्या नोटस घेऊन झोपतो. तेव्हा कुठे झोप येते. काय होतेय तेच समजत नाही…तिला पण असेच होत असेल का रे?’ मी म्हटले, ‘मित्रा! तुला बहुतेक प्रेम झालेय. तिच्या मनात काय आहे ते आपण उद्दया विचारूया. आता घरी जा.’ दुसर्‍या दिवशी तो लवकरच आला पण त्याला तिला विचारायचा धीर च नाही झाला. मी म्हटले, राहू दे, जसे चालले आहे तसे चालु दे. २/३ महिने असेच उलटून गेले. दोघांनी एकमेकांना काही प्रेमाची कबुली दिली नाही. सर्व नेहमी सारखेच चालले होते. पण बेचैनी वाढत होती. शेवटी राजा ने डेरिंग करायची ठरवली आणि मागणी घालायची ठरवली. खूप विचाराअंती असे ठरले की तिला एक चिठ्ठी लिहायची. आणि क्लास सुटताना तिच्या हातात द्यायची आणि निघुन जायचे. तिला विचार करायला वेळ द्यायचा आणि दुसर्‍या दिवशी भेटायचे. मोठ्या मुश्किलीने पत्राचा मायना सुचला आणि राजाने पहिले प्रेमपत्र लिहिले. दोन दिवस तो चिठ्ठी घेउन तसाच फिरत होता. डेरिंग च होत नव्हती.

चवथ्या दिवशी तो क्लास मध्ये लवकरच आला. थोडा टेंशन मधे दिसता होता. मला वाटले की प्रपोझ करायचे आहे म्हणून टेंशन आहे. मी विचारले काय झाले तर म्हणाला, अरे यार! आज ती शाळेत आलीच नाही रे. खूप दिवस बेकार गेला. तिच्या बिल्डींग खाली एक चक्कर मारुन आलो तर ती गॅलरी मधे दिसली पण तिने बघुन सुद्धा न बघीतल्यासारखे केले आणि न हसताच आत निघून गेली. असं कधीच झाले नव्हते रे!!! काय झाले तिला? तिला समजले असेल का मी तिला प्रपोझ करणार आहे ते? म्हणुन रागवली आहे का?

मी म्हटले, ‘रिलॅक्स !!! शांत हो टेंशन नको घेऊस, ती आता क्लास ला येतेय का बघुया मग काय ते समजेल.’

आम्ही तिची वाट बघत क्लासच्या बाहेर उभे राहिलो. थोड्या वेळाने ती आली पण एकच नजर टाकली आणि निघून गेली. नेहमीसारखे हाय नाही की चेहर्‍यावर हसू नाही. चेहरा खूप लाल झाला होता. डोळे सुजले होते. बहुतेक खूप रडली होती. तशीच न बोलता जाग्यावर जाउन बसली होती. आम्ही पण जाउन बसलो. कधी एकदा क्लास संपतो आणि तिच्याशी बोलतोय असे राजाला झाले होते. शेवटी कसा बसा क्लास संपला पण आमचा ग्रुप तसाच बसुन राहिला होता. ती पण तशीच बसली होती. मी त्याच्या हातात चिठ्ठी कोंबली आणि लांब जाउन बसलो. तिच्या मैत्रीणी पण लांब जाउन बसल्या. राजा उठला आणि तिच्या जवळ गेला. हातातली चिठ्ठी तिच्या हातात देण्यासाठी तिचा हात हातात पकडला आणि तिच्या हातात चिठ्ठी देण्यासाठी तिची मुठ उघडली तर तिच्या हातात अगोदरच एक चिठ्ठी होती. तिने खुणेनेच सांगितली की ती तुझ्या साठिच आहे. राजा ने आपली चिठ्ठी तिच्या हाताता दिली आणि तिची चिठ्ठी हातात घेतली. थरथरत्या हाताने चिठ्ठी उघडली भडाभडा वाचली आणि आनंदाने उडीच मारली. आणि माझ्या कडे बघुन तिच्या चिठ्ठीचे चुंबन घेतले. तिने पण चिठ्ठीत तेच लिहिले होते आणि त्याला प्रेमाची मागणी घातली होती. तो खूप खुश झाला आणि आमचे टेन्शन कमी झाले. काय पण प्रेम म्हणावे. दोघांचे खरच एकमेकांवर मनापासून प्रेम होते. दोघांना पण एकाच दिवशी प्रपोझ करावासा वाटला.

दोघेही एकमेकांना आवडत होते. आम्ही खुप खुश झालो. पण राणी च्या मनात काही वेगळेच होते. तिने चिठ्ठी वाचली तिच्या चेहर्‍यावर हसु उमटले…डोळ्यात अश्रु आले. तशाच भरल्या डोळ्यांनी चिठ्ठी दोन्ही हातात घेउन ति राजा कडे दोन मिनिटे बघत राहिली आणि मटकन खाली बसली व शेवटी तिने थांबवून ठेवलेले अश्रू मोकळे केले आणि जोराने हुंदका फोडला. आम्हाला काय झाले समजलेच नाही आम्ही तिच्या जवळ गेलो आणि तिला शांत केले आणि विचारले. मोठ्या मुश्किलीने तिने हुंदका आवरला आणि राजा चा हात हातात घेतला आणि म्हणाली, “मी हि चिठ्ठी तुला दोन दिवसांपुर्वीच लिहिली होती पण द्यायला हिंमतच होत नव्हती. मला पण तु खुप आवडतोस रे! पण…..” आणि तिने एक मोठा पॉझ घेतला. हमसुन रडायला लागली.

ती पाच सेकंद पण आमच्या काळजाचा ठोका चुकवुन गेली. ती म्हणाली, ‘माझ्या बाबांची बदलीची ऑर्डर आली आहे. आम्हाला उद्याच ठाणे सोडून कोल्हापुरा ला जायचेय..” तिच्या एका वाक्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आता कुठे प्रेमाला सुरवात झाली होती आणि जुदाई पण आली. आम्ही कोणी काहीच बोललो नाही. पुढे काहि चर्चा करण्यात अर्थच नव्ह्ता. सर्व शांत झाले होते. तसेच क्लास मधुन बाहेर पडलो नेहमी प्रमाणे चालू लागलो. मी सायकल घेतली आणि पुढे पुढे चालू लागलो. एक एक करत सगळ्या मैत्रिणींना सोडले आणि तिच्या बिल्डींग खाली पोचलो. दोघे काही न बोलता तसेच बघत राहीले. कोणाला काही सुचतच नव्हते. मी शेवटी विचारले, ‘उद्या किती वाजता निघणार आहे.’

ती म्हणाली, ‘सकाळीच सहा वाजता सामान भरायला गाडी येईल आणि आठ वाजेपर्यंत निघुन जावू.’ तसच जड अंत:करणाने आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

राजा सायकल वर सोडायला आला. बिल्डिंगच्या मागच्या गल्लीत उतरलो आणि राजाने इतका वेळ थांबून ठेवेलेले मन मोकळे केले. अगदी मनसोक्त रडला. मी फक्त त्याच्या पाठीवर थोपटत राहिलो दुसरे काय करू शकणार होतो. त्याच्या जागी जर मी असतो तर कदाचित मी काहीं वेगळे नसते केले. रडण्याचा भर ओसरल्यावर मी त्याला विचारले की तू जाणार आहेस का सकाळी? तो नाही म्हणाला. मला तिला सोडून जाताना बघवणार नाही…. ‘अरे पण ती वाट बघत राहिली तर?’ मी म्हणालो. ‘नाही बघणार आणि वाट बघितली तरी ती समजून जाईल.’ असे म्हणून त्याने खिशातली चिठ्ठी काढली आणि परत परत वाचत रडत राहिला.

पुढचे ४/५ दिवस राजा क्लासला आलाच नाही. मित्राकडे विचारले तर म्हणाला कि राजा शाळेत पणा नाही आला होता.. कदाचित तब्येत बरी नाही. विचार केला आज संध्याकाळी त्याच्या घरी जाउन बघुया. क्लास सुटल्यावर त्याच्या घरी गेलो. हा शांतापणे चादर घेऊन गादी वर पडला होता. आई ने सांगितले, ‘अरे दोन दिवसापासुन तब्येत बरी नाही. काही खातच नाही आहे. डॉक्टरांकडे घेऊन गेली तर ते म्हणाले काही झाले नाही…पण दिवसरभर झोपुनच आहे.’ मी त्याच्या बेड जवळ गेलो, त्याच्या डोक्यावरची चादर खाली केली. गोरा चेहरा लाल लाल झाला होता. कदाचित घरातल्यांची नजर चुकवून खूप रडला असावा. उशी पण ओली झाली होती रडून रडून.

मी विचारले…काय झाले?

‘काही नाही रे… तुला माहीत आहे ना.’ राजा म्हणाला.

‘तू गेला होतासा का तिला सकाळी निरोप द्यायला?’…मी

‘हो गेलो होतो. पण तिच्या समोर नाही गेलो. झाडामागुनच बघत होतो. ती खूप शोधता होती रे मला. सारखी माझ्या बिल्डिंग कडे बघत होती तिला वाटले होते की मी येईन. मला समोर जायची डेरिंग च नाही झाली. कदाचित गेलो असतो तर मला रडणे थांबवता आले नसते. शेवटी ती गाडीत बसली. तेव्हा मी झाडामागून बाहेर आलो आणि गाडी चालू झाल्यावर तिला हात दाखवला. कारण ती गाडी थांबवू शकत नव्हती हे मला माहित होते’ ‘तिने मला व मी तिला शेवटचे बघितले आणी हात उंचावुन टाटा केला…तिने पण केला…डोळ्यात पाणी असल्यामुळे तिचा चेहराच बघू नाही शकलो रे. आता ती कधीच भेटणार नाही ह्याचे खूप दु:ख वाटतेय रे…मन नुसते तुटतयं, छातीत एक असह्य कळ येतेय. मी तिच्या समोर नाही आलो म्हणुन कदाचित रागावली असेल ना रे?’

सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरुन गेला आणि हलकेच डोळ्यात पाणी उभे राहिले. मी चेहरा बाजुला करुन पाणी टिपले आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणालो, ‘उद्या शाळेत जा, क्लासला यायला सुरवात कर जरा बरे वाटेल’.

राजा मग पुढे एक आठवडाच च क्लासला आला. तिच्या रिकाम्या जागेकडे बघुन ढसाढसा रडायचा. तिची खुप आठवण यायची म्हणुन त्याने क्लासच सोडून दिला. मला कधी कधी भेटायचा चेहर्‍यावरचे सर्व तेजच निघून गेले होते. हसणे तर विसरल्यातच जमा होते. पुढे त्याच्या वडिलांची पण बदली झाली आणि तो पुण्याला गेला. जाताना भेटूना गेला, म्हणाला, पुण्या पासून कोल्हापूर जवळ आहे, कधी तरी जाउन येइन. बघू नशिबात असेल तर भेट होईल.

त्यानंतर तो कधी भेटलाच नाही. त्याचा काही फोन नंबर माझ्याकडे नाही आणि माझा त्याच्याकडे नाही. राजा आणि राणी दोघे ही कधी मला भेटले नाहीत. आता भेटली तरी मला ओळखताही येणार नाही. त्यांना मला ओळखता येणार नाही. जर ते दोघे ह्या इंटरेनेट जाला वर असतील आणि माझा ब्लॉग चुकून वाचतील तर बरे होईल. माझ्याशी संपर्क तरी करतील. मी अजुन तिथेच राहतोय. कधी येऊन आवश्य भेटा.

Wednesday, September 21, 2011

तू रोज रोज नाही बोललास तरी काही हरकत नाही..

तू रोज रोज नाही बोललास तरी काही हरकत नाही..
पण तुझे माझी नजर टाळून जाणे,
मी कधीच सहन करू शकत नाही...

मला का समजत नाही तुझे मन...,
मी का ओळखत नाही आपले ॠणानुबन्धन..

पण खरच गरज आहे का,
त्या नात्याच्या चौकटीची...
अन कुठल्याही कबुलीची...??

आणि खरच का गरज आहे,
जगाला ओरडून सान्गण्याची..?
आणि सारे काही फ़क्त फ़क्त माझ्यापासून लपविण्याची..??

ह्या दोघान्चीही गरज नाही आहे रे सख्या...
गरज आहे ती फ़क्त निखळ सत्य स्वीकारण्याची...

तुझ्या आणि माझ्या मनातलया त्या प्रेमाच्या ग्वाहीची...
अपेक्षा आहे ती फक्त प्रेमासाठी प्रेम करण्याची !!

Monday, September 19, 2011

आता कळतंय, तुझ्या प्रेमात पडलेय ते

आता कळतंय, तुझ्या प्रेमात पडलेय ते. याआधी रोजची संध्याकाळ अशी कातर नव्हती. आता वेळ जाता जात नाही. पण सांगणार तरी कसं? तुला तर थांगपत्ताही नाही. तू आपला बेफिकीर, स्वच्छंद, आपल्याच मस्तीत असतोस. जगाकडे लक्ष द्यायला तुला वेळ कुठाय? ' मला 'नाही' ऐकायची सवय नाही,' हा तुझा हेका आणि जे हवंय ते मिळवायचा अट्टहास. माझे नियम वेगळे आहेत रे तुझ्यापेक्षा. तुझ्याइतकं फायदा-तोटा बघून नाही वागता येत मला. त्या क्षणाला जे वाटतं, ते करून टाकते मी. एका अर्थाने मीसुद्धा स्वच्छंदी आहे. पण तुझ्यासाठी तेवढीच हळवी, केअरिंग आहे. आजकाल 'मैंने प्यार किया'चं टायटल साँग मी अगदी तन्मयतेने ऐकायला लागलेय. स्वप्नात रमणं आवडतंय. कधीतरी अगदी खुश होऊन नाचावंसं वाटतं. बासरीच्या सुरांवर डोलावंसं वाटतं. कधी अचानक बेचैनी जाणवायला लागते, डोळे भरून येतात. इतक्या सहज माणूस प्रेमात पडतो? तू कधी प्रेम केलंस कुणावर? इतकं सुंदर, आश्वासक फीलिंग दुसरं कुठलंही नसेल. माहितीय, तुला सांगणं मला कधीच जमणार नाही. भीती वाटते, कुणी दुसरीच आवडत असेल तुला तर? नाही सहन होणार मला ते. त्यापेक्षा हे सीक्रेट माझ्यापुरतं राहूदे. फक्त माझ्यापुरतं! मनोमन वाट बघत राहेन तुझ्या विचारण्याची. पण नाहीच विचारलंस, तरी चालेल. रिमझिम पावसात भिजताना तू आठवतोस. असं वाटतं, आता अचानक मागून छत्री घेऊन येशील. 'किती भिजतेस?' असं म्हणून दटावशील आणि माझ्या हातात गरमागरम कॉफीचा कप ठेवशील. बघ, माझी मनोराज्य सुरू झाली. माझा आतला आवाज सांगतो, की तू कधीतरी येशील. मी दर पावसाळ्यात तुझी वाट बघेन. येशील ना?

- तुझीच

पुढच्या जन्मी माझा साथीदार

आपल्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येते, की ज्याच्यावर सर्वाधिक प्रेम करतो. जास्त विश्वास आपण त्याच्यावरच ठेवतो. तसाच माझ्या आयुष्यात गौरव आला. त्याला पहिल्यांदा मी कॉलेजमध्ये पाहिलं आणि मैत्री करावीशी वाटली. फ्रेण्डशिप डेच्या दिवशी मैत्रीही केली. असं वाटायचं, की फक्त त्याला बघत बसावं. त्याचा हास्यचेहरा बघून मला अनोखा आनंद व्हायचा. पण त्याच्याशी बोलण्याची हिंमत व्हायची नाही. फक्त त्याचाच विचार करावा, त्याच्याशिवाय सोबत कोणीही नसावं, असं वाटायचं. मनातलं हे गुपित माझ्या मैत्रिणींना सांगितलं आणि त्यांनी ते जाऊन गौरवला सांगितलं. पण त्याचं उत्तर आलं नाही मला. या गोष्टीचं काहीच दु:ख नव्हतं. कारण त्याच्या जागी मी असते, तर माझंही उत्तर तेच असतं. ज्या व्यक्तीशी मी फक्त मैत्री केली आणि ज्याच्याबरोबर फारसं बोललेही नाही, त्याला पटकन 'हो' सांगणं कठीण आहे. तरीही मी त्याच्यावर खूप प्रेम करते. त्याला एक दिवस पाहिलं नाही, तर 'मी कॉलेजला का आले,' असं वाटायचं. त्याच्याशिवाय माझ्या मनात दुसरा कुठल्याच मुलाचे विचार येणं शक्य नाही. काही दिवसांनंतर गौरव आमच्या वर्गात येऊन बसायला लागला. नेहमी मागे वळून आमच्या बेंचकडे पाहायला लागला. त्याचं ते पाहणं, आमची नजरानजर झाल्यावर त्याच्या मित्राकडे बघून बोलणं, पुन्हा बोलता बोलता माझ्याकडे पाहणं असं त्याचं वागणं यातून माझ्या मनात त्याच्याबद्दल आणखी प्रेम वाढलं. त्याच्या काही मैत्रिणी माझ्या वर्गात आहेत. त्यांच्याकडून गौरवबद्दल आणखी काही माहिती मिळाली. मला हे समजलं, की गौरवचं कोणत्याही मुलीबरोबर प्रेमप्रकरण नव्हतं. तो मैत्रिणींशी फक्त मैत्रीच्या नात्याने बोलतो. त्याचे आईवडील जी मुलगी शोधून देतील, तिच्याबरोबर त्याला लग्न करायचंय, हे ऐकून माझ्या मनात गौरवसाठी जी इज्जत होती, ती अधिक वाढली. जो एका मित्राचं आणि मुलाचं कर्तव्य इतक्या चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो, त्याला चांगली व्यक्ती म्हणता येतं. प्रत्येक मुलगी हेच स्वप्न पाहत असते, की तिचा जोडीदार चांगला असावा. पण प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होत नाही. गौरवशी बोलण्याचा प्रयत्न माझा सुरूच होता. पण तो समोर आल्यावर माझ्या तोंडातून शब्द निघत नाहीत. त्याचं ते तिरप्या नजरेने पाहणं मला अस्वस्थ करतं. त्याचं त्याच्या मैत्रिणींशी जास्त बोलणं पाहून मला खूप वाईट वाटायचं. माझा उदास चेहरा पाहून माझ्या मैत्रिणीने त्याला सांगितलं. पण त्याचं उत्तर आलं नाही. तो माझ्यावर प्रेम करत नसेल, तर? नसो, पण मी त्याच्यावर खूप प्रेम करत होते, करते आणि करत राहणार. म्हणतात ना, खरं प्रेम असलं, की ती व्यक्ती स्वत:हून आपल्याकडे येते... माझं मन आजही त्याला पाहण्यासाठी, बोलण्यासाठी व्याकूळ झालेलं असतं. गौरव स्वत:हून माझ्याजवळ येईल, त्या क्षणाची मी वाट बघतेय. या जन्मी गौरव माझा झाला नाही, तर देवाला मी सांगेन, की पुढच्या जन्मी माझा साथीदार फक्त गौरव असावा...

त्याचीच,

उगीचच आपली भेट झाली. उगीचच इतकी ओळख झाली.

प्रेमात पडणं वगैरे सब झूठ असतं, असं मानणारी मी. आजूबाजूला गळ्यात गळे घालून फिरणारी प्रेमी युुगुलं पाहिली, की हा माझा मार्ग नव्हे, असं मानणारी मी. एकाच कंपनीत काम करताना सुरुवातीला तुझ्याशी तुटकपणे, जितक्यास तितकं वागणारी मी... तू कधी माझ्या हृदयाचा ताबा घेतलास, हे मात्र कळलंच नाही मला! ' मैत्रिणीकडे संत्र्याच्या झाडाचं बोन्साय पाहिलं. एवढ्याशा कुंडीतल्या झाडावर केवढी तरी संत्री लागलेली होती. मोठ्या उत्साहात मी तुला सांगितलं. त्यावर एकदम उसळून तू म्हणालास, 'बोन्साय? छे, मला नाही आवडत हे असले प्रकार. माणसाच्या फायद्यासाठी केलेलं क्रौर्य आहे हे. अगं, झाडांनाही मन असतं. मुक्तपणे त्यांना वाढू द्यायचं. आपल्या स्वातंत्र्यावर गदा आली, तर किती राग येतो आपल्याला! तसाच त्यांनाही येत असेल. पण ती झाडं बिचारी बोलू नाही शकत. जे आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत, अशांच्या भावना आपण जाणून घेऊ शकत नसू, तर माणूस म्हणायच्या योग्यतेचेच नाही आपण!' छोटीशीच घटना, पण झाडांच्याही भावना समजून घेणारं तुझं तरल संवेदनशील मन मला अगदी खोलवर आवडून गेलं. माझ्याबाबतीतली प्रत्येक गोष्ट तुला सांगितल्याशिवाय मग मला चैनच पडेनासं झालं. एखाद्या दिवशी मूड नसेल, तर काहीतरी जोक्स सांगून तुझं हसवणं, रागावणं, रुसणं हे सारं मला आवडू लागलं. मला म्हणायचास, की डोळ्यांनी बोलायला शिक. प्रत्येक गोष्ट शब्दात सांगता येत नाही. तुला ती कला चांगलीच अवगत आहे. माझ्या डोळ्यांनी मात्र माझ्याही नकळत माझ्या मृदू भावना तुझ्यापर्यंत पोहोचवल्या असाव्यात. तुझ्याबद्दलच्या भावनांचा माझ्याआधी तुला सुगावा लागला. पण त्या वेळेपासून तू स्वत:ला अलिप्तच ठेवायला लागलास. राधेने श्रीकृष्णाला 'निमोर्ही' असं म्हटलं होतं. दुसऱ्याला आपल्या मोहात पाडायचं आणि स्वत: मात्र कमलदलाप्रमाणे अलिप्त राहायचं. तसंच काहीसं मला तुझ्याबाबतीत वाटू लागलंय. मला माहीत आहे, जात-वय यासारख्या समाजाने घातलेल्या बंधनांमुळे आपण नाही एकत्र येऊ शकत. पण प्रेमात काय आणि युद्धात काय, सारं काही क्षम्य असतं, असं म्हणतात, ते खोटंच म्हणावं लागेल. कुठेतरी वाचलंय, की प्रेम हे प्रतिध्वनीसारखं असतं. जितक्या तीव्रतेने तुम्ही एखाद्यावर प्रेम कराल, तितक्याच तीव्रतेने ते तुमच्याकडे परत येईल. पण ज्याअथीर् ते माझ्याकडे परत येत नाहीय, त्याआथीर् मी असं समजेन, की माझ्याकडून तितकं प्रेमच केलं गेलं नसावं... पण... हेही खरं मानायला माझं मन तयार होत नाही. आता असं वाटतं, की उगीचच आपली भेट झाली. उगीचच इतकी ओळख झाली. या जन्मी जर शक्य नसेल, तर निदान पुढच्या जन्मी तरी असं राधा नाही... 'रुक्मिणी' व्हायचंय मला!-

तुझी,

मैत्रीचा हक्क तरी माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस.

प्रेम ही कल्पना मनाला स्पर्शून जाते. ही भावनाच निराळी आहे. प्रेमाची व्याख्या सगळे करतात. माझी व्याख्या वेगळी आहे. एकमेकांना समजून घेतलं, विश्वास ठेवला, विचारांची तडजोड केली, तरच संसार सुखाचा होतो. मी तुझ्यावर प्रेम केलं. तुला समजून घेतलं, तुझ्यावर विश्वासही ठेवला. तुला मी आवडत होते, तर का तुला असं वाटलं, की आपलं प्रेम संपवून टाकू या? केवळ ग्रुपमधल्या मैत्रिणी तुला काहीतरी बोलल्या आणि तू मला सोडण्याचा निर्णय घेतलास. असं का वागलास? काय कारण होतं, माझं प्रेम तोडण्याचं? का मला टाळत होतास? हे सर्व प्रश्न माझ्या मनात घर करून आहेत. मी तुला विचारलंही, पण तू मला टोलवाटोलवीची उत्तरं दिलीस. म्हणून यापुढे तुला प्रश्न विचारणार नाही. तू स्वत:हून सांगशील, याची वाट बघेन. प्रेम तोडण्याचं कडू विष मला प्यायला लावलंस. पण तू सुखात राहावंस, एवढीच माझी इच्छा आहे. शैलेश, तुला आठवतात, आपण सोबत घालवलेले दिवस? 14 फेब्रुवारी 2004 ते 26 ऑक्टोबर 2004 हे माझ्यासाठी अनमोल क्षण आहेत आणि यापुढेही असतील. आयुष्यात कधीही विसरता येणार नाहीत. तुला वाटत असेल, की मी खोटं बोलते. पण यातला शब्दन्शब्द खरा आहे. माझ्या आयुष्यात तुला किती महत्त्वाचं स्थान आहे, हे तुला माहीत नाही. माझं प्रेम खरं आहे रे तुझ्यावर. मला तुझी मैत्री गमवायची नाही. प्रेमाआधी जी मैत्री होती, ती मला हवी आहे. मनातलं सर्व काही तुला सांगितलं असतं, पण कदाचित तू ऐकलंही नसतंस. एकाच ग्रुपमध्ये राहून तुला माझ्याशी बोलायला वेळ मिळत नाही ना! म्हणून माझ्या मनातला भावना तुला पत्राने कळवण्याचा निर्णय घेतला. हे सर्व मी तुझ्यासाठीच केलं. मी तुझ्यातला प्रियकर गमावला. तुझ्यातला मित्र गमवायचा नाही. तू सांगशील, ते मान्य करेन, पण माझ्याशी मैत्री तोडू नको. ही मैत्री निर्मळ, निखळ असेल. प्रेमाचा एकही विषय मी काढणार नाही. तू सुखात राहा, हीच प्रार्थना मी रोज करते आणि करत राहेन. तुला कधीच विसरू शकत नाही. ज्याला आपण विसरतो, त्याची आठवण येते. तू नेहमी माझ्या मनात राहतोस. तुझ्या सुखासाठी काहीही करायला तयार आहे. म्हणून तर प्रेम संपवून टाकलं, तरी तुझी मैत्री नाही संपवली. तुला माझ्या या भावना कळल्या, तर मी सर्व काही जिकलं. माझं प्रेम आजही तूच आहेस, उद्याही तूच राहशील, तू माझ्यासोबत राहा किंवा नको राहू, आयुष्यभर तुझ्या आठवणी माझ्यासोबत राहतील. प्रेम करते तुझ्यावर, तिरस्कार करू नकोस, आयुष्यात माझ्याशी कधीही बोलणं सोडू नकोस. सर्व सहन करेन मी, पण तुझा अबोला नाही. सदैव सुखात राहा, आयुष्यात पुढे जात असताना एकदा तरी मागे वळून पाहा. उभी असेल तिथे फक्त तुझी मैत्रीण, मैत्रीचा हक्क तरी माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस.-

तुझी मैत्रीण,

प्रेम ही एक सजा आहे

माझ्या मनातील प्रत्येक भाव तू ओळखला आहेस. तुझ्यापासून काहीच लपून राहिलेलं नाही. तुझ्याही मनात माझ्याबद्दल प्रेम, आस, कोमल भावना आहे. माझ्याही मनात तेच आहे. तरीही आपण दूर आहोत. का? कशासाठी? या भेकड समाजासाठी की या समाजाला घाबरणाऱ्या आपल्या आईवडिलांसाठी? कुणी बनवला हा समाज? आपणच. मग याला का घाबरायचं? तुझी आणि माझी जात वेगळी आहे, म्हणून आपण दूर-दूर राहायचं? मला नाही पटत हे सगळं. खरं सांगू, हे सगळं मी तुच्छ मानते. या जगात सर्वश्रेष्ठ मैत्री आणि प्रेम या दोनच गोष्टी खऱ्या आहेत. त्या नि:स्वाथीर् असतात आणि जर या गोष्टी नि:स्वाथीर् नसतील, तर त्या खऱ्याही नसतात. तुझ्या प्रेमात पडल्यापासून मी बरंच काही शिकले. प्रेम सगळं शिकवतं, असं म्हणतात ना, ते खरं असल्याचं मी अनुभवलं. तुझ्या प्रेमाने मला कवी बनवलं. सहनशील, स्वतंत्र विचारसरणीचं नम्र व्हायला लावलं. स्पर्शाशिवायही आधार देता येतो, याची तुला उत्तम जाणीव आहे. तुझा बोलका चेहरा सतत माझ्यासमोर असतो आणि तो पाहून माझी लेखणीही उत्तर देऊ लागते. तुझं ते गोड हसणं पाहून कुणी फिदा नाही झालं, तरच नवल. तुझा खेळकर स्वभाव कुणालाही आपलंसं करतो. तुझ्या शुद्ध आणि नि:स्वाथीर् हसऱ्या-गोड स्वभावामुळेच मी तुझ्यात कधी गुंतत गेले, कळलंच नाही. कदाचित आपलं प्रेम मोठ्यांच्या नजरेत चुकीची गोष्ट असेल. पण प्रेम करताना मी त्यांची परवानगी घेतली नव्हती. आताही मी घाबरत नाही. तुझा स्वभाव 'मोडेन पण वाकणार नाही,' असा आहे. मग आपण चुकत नसलो, तर भीती कशाची? प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचे गोड क्षण येतात. ते लग्नाआधी आले, तर त्याला मान्यता मिळत नाही. का? ते मलाही माहीत नाही. पण मला इतकं नक्कीच ठाऊक आहे, की तू माझा आहेस... फक्त माझा! आयुष्यात प्रत्येकाने एकदा प्रेम केलंच पाहिजे, लोकं म्हणतात, प्रेम ही एक सजा आहे, पण त्यांना कुठे ठाऊक असतं, की झुरण्यात काय मजा आहे...

- फक्त तुझीच,

तुला पाहिलं आणि प्रेम या शब्दाचा अर्थ समजला.

तुला पाहिलं आणि प्रेम या शब्दाचा अर्थ समजला. प्रीतीचं फूल तुलाच अर्पण केलं. तुझ्या त्या पहिल्याच प्रेमळ नजरेच्या दवबिंदूत भिजून गेले मी आणि मग कळलंच नाही , की कधी तुझ्यात इतकी गुंतले मी! तुझ्याही मनाच्या प्रीतबागेत प्रीतीचा केवडा फुलला होता आणि मी तर तुझी राधा झाले होते. पण... पण का कुणास ठाऊक , तू माझ्यावरील प्रेम व्यक्तच केलं नाहीस. मी मात्र प्रीतीच्या शांत किनाऱ्यावर तुझ्या होकाराच्या प्रतीक्षेत बसून राहिले. आपलं प्रेम अबोलच , तरीही ते एकमेकांच्या मनाला जाणवत होतं. म्हणूनच तर... तू वळून पाहिलंस. तुझा तो एक दृष्टिक्षेप... त्या क्षणाला वाटलं. तू फक्त माझा आहेस. फक्त माझा. मी धावले तुझ्या मिठीत विसावण्यासाठी. वाटलं , की विरघळलास माझ्यात तू. पहिली मी आणि नंतर तू असं आपलं वेगळं अस्तित्व आता उरलेलं नाही. पण...तो निव्वळ माझा भ्रम होता. माझ्या हातात गवसली , ती फक्त तुझी सावली. तीही सूर्यास्तानंतर माझ्या हातून निसटली रे..! माझी ओंजळ रिकामी ती रिकामीच. ते दिवस मात्र मोरपंखी होते. आरशात चेहरा पाहताना भाळी लावलेला चंद कसा दिलखुलास हसायचा. केसात माळलेला गजराही मग लाजायचा. मन पाखरू झालं होतं. तुझ्याच अवतीभोवती ते रुंजी घालत राहायचं. आता मात्र... सारंच चित्र बदललंय. आता पूवीर्सारखे गुलाब आवडत नाहीत मला. रातराणीच आवडते. कारण रात्रभर तीच एक सोबत देते. माझ्या माळ्यावरचा चंदही रुसलाय. तुझ्या आठवणींची रोज मैफल भरते आणि डोळ्यांतून श्रावणसरी बसरते. तरीही मनात एक आशा सूयोर्दयाबरोबर जन्म घेते. अजूनही वाटतं , की तू येशील. ओल्याचिंब देहानेच मला कवेत घेशील आणि म्हणशील , ' फक्त तुझ्यासाठी आलोय. तुझी प्रतीक्षा संपली. आपण एक प्रेमनगर वसवू. माझी हृदयस्वामिनी आहेस तू. ' माझ्या स्पर्शाचा नाजूक गुलाब टिपशील तू एखाद्या गुणगुणाऱ्या भ्रमरासारखा. माझ्या केसातील गजराही लाजेल. माझ्या माळ्यावरील चंदही हसेल पुन्हा. आपलं अबोल प्रेम बहरेल , फुलेल. मला अजूनही वाटतं. तू परत येशील , आपल्या अबोल प्रेमाला शब्दांचं दान देशील. येशील ना साथी ?

जीवनाच्या वाटेवर किती जण भेटतात

जीवनाच्या वाटेवर किती जण भेटतात, त्याची गणती नसते. पण गणतीत न बसणारे तुझ्यासारखे क्वचितच असतात. क्षणभुंगर जीवनात प्रत्येक जण जगायचा असतो आणि मी तुझ्या सहवासात तो जगत आहे. तुला पाहिलं, तेव्हापासून एक अनामिक ओढ लागली. तुला जाणून घ्यायची प्रबळ इच्छा मनात घर करू लागली. पण नेमक्या शब्दात मांडता येत नाही... कोणत्याही नात्याची सुरुवात प्रथम मैत्रीतूनच होत असते. मी त्याला आवडते, हे त्याने जरी प्रत्यक्ष व्यक्त केलं नसलं, तरी त्याच्या डोळ्यातील भाव खूप काही सांगून गेले. शब्दाविना झालेला संवाद हृदयापर्यंत पोहोचला अन् स्वर्गसुखाचा आनंद मिळाला. त्याला 'आय लव्ह यू' हे शब्द फार बोथट, उथळ वाटतात. त्याची भावना तीन शब्दात मावणारी नव्हती. आमचं प्रेम फार समंजस आहे. त्यातही समान प्रेम देण्याची आणि घेण्याची वृत्ती असल्यामुळे ते अधिकच दृढ झालंय. माझा छोटासा आनंद, दु:ख मी तुला सांगावं अन् तू मला ते समजवून सांगावंस, असं वाटतं. तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. म्हणूनच तर तुझ्यापासून दूर राहावंसं वाटत नाही. पण या अशा समंजस प्रेमात माझ्याकडून एक चूक घडली. ती म्हणजे, दुसऱ्याच्या बोलण्यावरून त्याच्यावर संशय घेतला. तेव्हा त्याला फार वाईट वाटलं. कारण जसं कोणतंही नातं विश्वास, आपुलकीवर आधारलेलं असतं, तसं आमचंही आहे. चूक उमगल्यावर फार पश्चात्ताप झाला. त्याबद्दल माफी मागते. तू आधी कविता वगैरे करायचास, ते आज बंद केलंस, याचं वाईट वाटतं. कारण कवितांच्या माध्यमातून आपण आपल्या भावना, सुखदु:ख व्यक्त करत असतो. माणसाने वेळात वेळ काढून आपला छंद, कला जोपासायला हवी. म्हणून तू पुन्हा कवितेच्या विश्वास रमून मन प्रफुल्लित ठेव, हीच माझी इच्छा आहे. दूर राहूनही तुझी साथ मला हवी आहे... देशील? प्रेमाने ओतप्रोत भरलेले शब्द साठवून माझं ध्येय गाठायचंय. त्यासाठी बळ मला तुझ्याकडून हवंय... देशील ना? प्रेमात बंधनं, मर्यादा काही स्तरावर असाव्यात, कारण ती अंतरीची ओढ असते. जमेल तसं घ्यायचं अन् जमेल तसं द्यायचं असतं. पण त्याच्यासाठी एक जिवंत मन असावं लागतं. प्रेमाचे क्षण वेचायला आणि टिपायला, हो ना?

- तुझीच,

प्रिया

Thursday, September 8, 2011

मैत्री की प्रेम ?

कधी न संपणारी
फक्त मैत्रीच असत्ते
मैत्रीमधले प्रेमही तसेच असते
... कधीच न संपणारे

मैत्रीमध्ये हसवा रुसवा असतो
प्रेमात फक्त रुसवा अन फसवा असतो
मैत्री नाजूक धागा आणि अटूट बंधन
प्रेम कीतीही नाजूक पण टूटतेच कधीतरी

प्रेम ह्याने केले प्रेम त्याने केले
प्रेम करणारा एकटाच असतो ना
मैत्री मी केली का त्याने केली
मैत्री तिधेही निभावतात....

मैत्रीनेच प्रेमाला सुरूवात होते
ऐकल होते पण खरच आहे की..
माझ्या मैत्रीत प्रेम आहे...
पण माझ्या प्रेमात मैत्री कधीच नसणार...
फक्त प्रेम आणि फक्त प्रेमच असेल..

तुम्हाला कोणते प्रेम आवडते...
प्रेमात मैत्री असते मैत्रीनंतर प्रेम असते
मैत्रीपेक्षा जास्त प्रेम की प्रेमापेक्षा जास्त मैत्री?
मग तूम्ही काय मागाल... मैत्री की प्रेम ?
 

Tuesday, July 26, 2011

प्रेम कसे होते हे कळतच नाही

 
प्रेम कसे होते हे कळतच नाही
वेडावलेले मन समजून राहत नाही.

वेडावलेल्या मनाला त्याचीच आस लागून राहते
जशी चातक पक्षाला एका थेंबाची गरज असते.

प्रेमाचा आनंद लपवता येत नाही
जसे वसंत ऋतू मध्ये मोर नाचल्याविना राहत नाही.

कळतच नाही प्रेम हे कधी होवून जाते
अंधारमय जिवन मग प्रकाशमय वाटू लागते.

प्रकाशमय जिवनातील मग आकाशात चंद्रच राही
निघून जाताच जिवनातून प्रेम मग पौर्णिमेला ही अंधार होई.

Friday, July 22, 2011

किती छान असतं............

किती छान असतं ना ?
आपण कुणालातरी आवडणं..


कुणीतरी तासनतास आपलाच विचार करणं..

खरच !किती छान असतं ना
आपण कुणालातरी आवडणं..


कुणाच्यातरी पर्सनल डायरित
आपलं नाव असणं,

चार-चौघात कुणीतरी सतत
आपलाच उल्लेख करणं,

किती छान असतं ना ?

आपण कुणालातरी आवडणं..


कुणीतरी आपलं हसणं
काळजात साठवनं,
कुणालातरी आपला अश्रू

मोत्यासमान वाटणं..

किती छान असतं ना,

आपण कुणालातरी आवडणं..


कुणीतरी आपल्या फोनची

तासनतास वाट पाहणं,

आपल्याला एकदा ओझार्त पाहण्यासाठी,

तासनतास बस स्टॉप वर उभं राहणं,

देवसमोरही स्वताआधी
आपलं सुख मागणं,
खरच !किती छान असतं ना

आपण कुणालातरी आवडणं..


कुणीतरी डोळ्यात जीव आणून

आपली वाट पाहणं,

आपल्या उपवासा दिवशी

त्यानं ही हटकून उपाशी राहणं,

खरच !किती छान असतं ना

आपण कुणालातरी आवडणं..


कुणीतरी आपला विचार करत

पापनीवर पापनी अलगत टेकवनं..

झोपल्यावर मात्र
स्वप्नातही आपल्यालाच पाहणं..
खरच, खूप छान असतं ना

आपण कुणालातरी आवडणं..

तुझा हात हातात घेऊन

तुझा हात हातात घेऊन
मला दूरदूर फिरायचय

पट पट चालत नाहीस
म्हणून
तुला खूप रागवायच य

फुगलेले तुझे गाल बघून

परत समजवायच य
तुझ्या गालावरच्या अश्रूंना

माझ्या ओठांनी तिपायचय


तुझा हात हातात घेऊन

मला दूरदूर फिरायचय

सोनेरी कोवळ्या उन्हात

चमकत्या पाण्यात उतरायच य


तुझ्या लटक्या नकारात

तुला चिंब भिजवायच य

ओल्या मिठीत तुझ्या

तासन्तास हरवायच य


तुझा हात हातात घेऊन

मला दूरदूर फिरायचय

पायात काटा मोडला म्हणून

तुला कवेत घ्यायच य


थोडे अंतर का होईना

तुझ्या डोळ्यांत बघून चालायच य

अचानक जाणीव येताना

पापनीला झुकताना बघायच य


तुझा हात हातात घेऊन

मला दूरदूर फिरायचय

साथ तुझी...........

फक्त तू नकोस मला
साथही तुझी हवी आहे

शांत स्थळी एकांतवेळी

प्रीत तुझी हवी आहे


शृंगार प्रेम नको मला

वात्सल्य प्रेम हव आहे

सांजवेळी सूर्यास्ताला

प्रेमगीत हव आहे


दवबिंदू नकोत मला

रिमझिम पाऊस हवा आहे

रानफुलाला सुखावणारा

गार वारा हवा आहे


फक्त शब्द नकोत मला

अर्थ त्यातला हवा आहे

तिमिरातून तेजाकडचा

मार्ग त्यातून हवा आहे


सृष्टी सारी नको मला

द्रुष्टी तुझी हवी आहे

तुझ्या डोळ्यात दिसणारा

विश्वास मला हवा आहे


तुझा दुरावा नको मला

सहवास तुझा हवा आहे

खचनाऱ्या माझ्या मनाला

आधार तुझा हवा आहे


क्षण तुझे नकोत मला
प्रत्येक क्षणी तू हवी आहेस
वेळ तुझी नको मला

वेळीस तू हवी आहेस

का माहित नाही..........

का माहित नाही..........
का माहित नाही
तुझ्या कुशीत यावस वाटतय

तुझ्यामाझ्यातिल प्रत्येक विरहाच्या क्षणाला
आज दूर भिरकवावस वाटतय


माझ्या मनातील प्रत्येक प्रश्नानाना
पुसून तकवास वाटतय

मनात साचलेल्या काल्या आभालाला
आज बरसावस वाटतेय


तुझ्या विरहात गहिवरलेल्या प्रत्येक क्षणाला
आज तुझ्या कुशीत मुक्त करावस वाटतय

आज फ़क्त एकदा स्वतःला
तुझ्यात हरवावस वाटतय


का माहित नाही
तुझ्या कुशीत यावस वाटतय

सखे, तुझ्या ओल्या केसात


 सखे, तुझ्या ओल्या केसात
सुरांचा उन्माद असु दे


तुझ्या केसातुन बरसावं... माझ्या शब्दांचं वादळ

त्याला कवितांचा नाद असु दे



तुझ्या रातराणी मेहेफ़िलिनं... छेडावी जीवघेणी गझंल,

माझ्या उध्वस्त जीवाची
.........................त्याला उन्मुक्त दाद असु दे


तो मोहाचा घोट प्यायला.... मी कधी पासुन आतुर,

तुझ्या अनावर पाशाची

........................त्याला मनसोक्त साद असु दे



सखे, तुझ्या ओल्या श्वासात

माझा
....
.........................गुलमोहरी श्वास असु दे
तुझ्या देहावर फ़ुलावा..... माझ्या स्पर्शाचा सडा,
.
तुझ्या मस्तवाल कळ्यांना

..........................माझ्या मिठीचा वास असु दे



तुझी कातरवेळ असावी..... माझ्या रात्रीला बिलगायला व्याकुळ,

तुझ्या संधी प्रकाशाला सुद्धा

........................माझ्या विरहाचा भास असु दे



तुझ्या पारीजातकानं झुरावं........ माझ्या उन्मत्त बहाव्यासाठी,

तुझ्या वसंतातल्या श्रुंगाराला

.......................माझ्या पानझडीचा ध्यास असु दे