Friday, March 2, 2012

ओढ

कोणतीही ओढ लागली या मना,
येणाऱ्या वाटेकडे पाहतो हा कुणा,
बदललेले भाव सारे बदललेल्या संवेदना,
बदललेले विश्व मनीचे बदलल्या खुणा,
भांबावते मन राहत नाही भाना,
कळते तुला जरी मलाही सांगना.

अलगद निसटून जातो मुठीतून माझ्या,
अलवार शिरू पाहतो मिठीत कुणाच्या,
नव्हत्या अश्या तऱ्हा पूर्वी या मनाच्या,
नव्हत्या अश्या कधीच अधिरश्या, बेभानश्या.

अजानते स्वर, अजानते हे सूर,
हि सरगम हि नवीनवेली फुलते वेळीअवेळी,
रूप हि अजानते केवळ फसवे भास हे,
फुलल्या तरी मनी या किती अबोली...... किती चमेली.

हा वेगळा अनुभव आहे हि वेगळी प्रचीती,
पुसटसे बिंब केवळ उमटते चित्ती,
नावही नसे ठावे, ठाऊक नसे कि कोण आहे,
पण माझ्या एकांतात केवळ त्याची खुमार राहे.

त्याची हि अवस्था होते का अशी,
तोही झुरतो का रोज अधीर मनाशी,
होईल भेट जेव्हा कळेल का त्याही,
कि आहोत जवळीच आणि भेटही होत नाही.

हीच जाग सदा होते अंतरी,
मी नाही एकटा सोबत आहे कुणीतरी,
भेट होईल आज वा उद्या ना तरी,
भेटतील हे दोन जीव या प्रीत सागरी.

"लग्न"

तू  फक्त  ओरबडलंस.................. एका  भुकेलेल्या  जनावराप्रमाणे,
मला   त्यात  विवेकी  माणूस  दिसलाच  नाही  कधी.
दिसला  तो  फक्त  वासनांध  राक्षसच.

माझ्या  मऊशार   कोमल   मेहंदीभरल्या  हात्तांना कुरवाळायाचं  सोडून कुस्करलस,
माझ्या नाजुकश्या  पाकळ्यागत   ओठांना तुझ्या दातांनी चिरडलस,
आणि  माझं  कौमार्य  तुझ्या  दांडगट पुरुषपणाखाली भरडलस.

ज्या  नाजूक  गाठी  प्रेमाने  सोडायच्या असतात त्या  तू तोडाव्या  तश्या तोडल्यास,
आणि  वर्षांचा  कुणी  भुकेला  जेवावा तसं खात सुटलास.
जे  पहिल्या  रात्री  तेच  प्रत्येक  रात्री.
मीही  मन  मारून  पडून  रहातेसमजूतदारपणा  जनावाराकडून कसला  करायचा.

तू  फक्त ओरबडलंस  तेव्हाही जेव्हा मी गर्भार  होते,
आणि  तेव्हाही  जेव्हा  किमान तेव्हा  तरी  जेव्हा  खरच  नको  होतं ओरबाडयला.

इतकं  करूनही  तू  समाजातला  एक  आदर्श नवराआदर्श  पुरुषआता  तर  आदर्श बापही होशील.
तुला  तुझा  व्यभिचार  या  आदर्शपणाच्या ओझ्याखाली मुक्तपणे जाऊन  बाजारात करता  येत नव्हता,
आणि  कुणावर  बलात्कार  करण्याची  तुझी ताकदच  नाही  तुझ्या  घाबरटपणामुळे,
म्हणून तू  "लग्न" ही  सोयीस्कर  वाट  निवडलीस.

न सोडवता आलेला गुंता.

आज  दुपारी  वेळ  जात  नव्हता  म्हणून  कपाटातली  जुनी  कंपास बाहेर  काढली,
आणि  मग  college मधल्या  कितीतरी आठवणी  जाग्या  झाल्या.
ते तुटलेलं टोपणछोट्या  डब्बीचं ढाकण,
काळवंडलेला  खोडरबर, थोटकी पेन्सील,
छाप पुसटलेली इंचपट्टी, friendship  चे  band ,
आयकार्डची लेस, पिक्चरच, बसच जुनं तिकीट,
कॅन्टीनची  बिलं आणि  किती काय.
आणि  हो  तो  महालक्ष्मी   मंदिरातून आणि  सिद्धिविनायक मंदिरातून,
माझ्यासाठी तू घेतलेले  ते  दोन  धागे,
कामावर जायला  लागल्यापासून या  साऱ्या आठवणी याच कंपासमध्ये बंद केलेल्या,
त्या आज उघडल्या,

ते दोन धागे  एकमेकांत गुंतले  होते,
गुंता  इतका  होता कि  टोकं खेचावीत  तर  मधली  गाठ घट्ट बसायची,
आणि  गाठी  सोडवाव्यात  तर टोकंच  हरवायची,
फार  प्रयत्न केला पण गुंता  काय सुटेचना,
आणि त्या पायी मलाही  काही  सुचेचना,
धागे  तोडण्याशिवाय पर्याय नव्हता.

तुझ्या  माझ्या बाबतीत देखील असंच झालं होतं,
दोन अनोळखी धागे एकमेकांत केव्हा  गुंतलो ते कळलंच नाही,
आपल्या  दोघांना जरी वेगळ व्हायचंच  नव्हतं,
पण समाजाला, घरच्यांना ते मान्य  नव्हतं,
त्यांनी तो  गुंता  सोडवू पाहिला तितका गुंता  आणखीनच  वाढत गेला,
तुझी माझी गाठ तितकीच घट्ट होत गेली,
नाना  प्रयत्न झाले पण त्यांनी हार  मानली  नाही,
शेवटी त्यांनी धागे तोडलेच,
किती  गाठी मारून स्वतःला जोडलं आहे  तू  आणि  मी हे  आपल्यालाच  माहिती,
"जात"   या  शुद्र  संकल्पनेवर  थुकावसं वाटून देखील,
त्या समोर झुकावं लागलं याची  खंत  वाटते आज.

मी  ते(निदानदोन घागे तसेच  ठेवले,
कंपास बंद  केली आणि झोपून  घेतलं,
संध्यकाळी  आमच्या  समाजाचा  मेळावा  आहे  त्यात  जायचं  आहे  "fresh "  होऊन

Monday, January 2, 2012

"छोटस गोंडस बाळ (जन्मायच्या आधी ) :- देवा, त्यांनी मला सांगितले कि मी आता पृथ्वीवर जाणार आहे, पण मी कित्ती छोटीशी आहे रे ......... मला चालता पण येत नाही आणि बोलताही येत नाही !!
देव :- एक सुंदर परी तुझी काळजी घेईल, ती तुझे सदैव रक्षण करील.
बाळ :- देवा, त्या सुंदर परीला मी काय म्हणून हाक मारू ?
देव :- तू त्या सुंदर परीला " आई " आशी हाक मार !!" ♥ ♥ ♥

"प्रेयसी :- तू दुसर्या मुलीकडे बघतोस तेव्हा तिच्यात प्रथम काय बघतोस ?
प्रियकर :- कोणाच सुंदर हास्य, कोणाचा सुंदर चेहरा, कोणाचे सुंदर डोळे .... अस बघतो का ग ?
प्रेयसी :- ( रुसून, फुगून, नाक मुरडून) सगळी मुले सारखीच असतात !!
प्रियकर :- ( तिला जवळ घेऊन) पण सुंदर हास्य, सुंदर चेहरा, सुंदर डोळे, सुंदर मन आणि सुंदर हृदय हे सगळ एकाच ठिकाणी फक्त आणि फक्त तुझ्याकडेच मला दिसतं आणि दर वेळी मला हे त्या मुलींकडे बघून जाणवतं !!!!"
♥ ♥ ♥

"प्रेयसी :- तू दुसर्या मुलीकडे बघतोस तेव्हा तिच्यात प्रथम काय बघतोस ?
प्रियकर :- कोणाच सुंदर हास्य, कोणाचा सुंदर चेहरा, कोणाचे सुंदर डोळे .... अस बघतो का ग ?
प्रेयसी :- ( रुसून, फुगून, नाक मुरडून) सगळी मुले सारखीच असतात !!
प्रियकर :- ( तिला जवळ घेऊन) पण सुंदर हास्य, सुंदर चेहरा, सुंदर डोळे, सुंदर मन आणि सुंदर हृदय हे सगळ एकाच ठिकाणी फक्त आणि फक्त तुझ्याकडेच मला दिसतं आणि दर वेळी मला हे त्या मुलींकडे बघून जाणवतं !!!!"
♥ ♥ ♥
♥ कॉलेज मध्ये असताना गुलाबाचं फुल तू झाडावरून तोडलंस पण ते कुठेच न वापरता पुस्तका मध्ये ठेवून दिलंस, पुढे ते फुल तसंच पुस्तकामध्ये राहून गेलं ...........
त्याचवेळी माझ हृदय पण तू तोडलंस, ........... आणि ते देखील कुठेही न वापरता असंच पडून राहिलं ..... !!! :(
आज, वर्षानुवर्षे पुस्तकामध्ये ठेवलेला पण सुकून व कोमेजून गेलेला तो "गुलाब आणि मी" ह्यांमध्ये काहीही फरक राहिलेला नाहीये ................. आमच्या दोघांमधला सुगंध आता निघून गेला आहे पण दोघांच आस्तित्व मात्र अजूनही तुझ्या आयुष्यात एकाच छोट्या अपेक्षेने असंच पडून राहिलं आहे .......... तू येशील आणि पुस्तकाची (आयुष्याची) पाने चाळून बघशील !!! ♥
"पोस्टमन काका म्हणाले शक्यच नाही ............ :-(
मालगाडी वाले म्हणाले दिवसातून कमीत कमी १० गाड्या पाठवायला लागतील ....... आणि असे किती दिवस लागतील ते आम्ही सांगू शकत नाही ... :-(
विमान सेवा वाले सुद्धा नाही म्हणाले ......... एवढ वजन विमानात ठेवायला परवानगी नाही म्हणे .... :-(
माझं तुझ्यावरच प्रेम मला तुझ्याकडे पाठवायचं होतं ........... "पण सगळे
म्हणाले खूप मोठं आहे" !!!!!! ... :-) ♥ ♥ ♥

♥ Love has no unit ... Is't it ? Keep loving infinitely ♥
"पोस्टमन काका म्हणाले शक्यच नाही ............ :-(
मालगाडी वाले म्हणाले दिवसातून कमीत कमी १० गाड्या पाठवायला लागतील ....... आणि असे किती दिवस लागतील ते आम्ही सांगू शकत नाही ... :-(
विमान सेवा वाले सुद्धा नाही म्हणाले ......... एवढ वजन विमानात ठेवायला परवानगी नाही म्हणे .... :-(
माझं तुझ्यावरच प्रेम मला तुझ्याकडे पाठवायचं होतं ........... "पण सगळे
म्हणाले खूप मोठं आहे" !!!!!! ... :-) ♥ ♥ ♥

♥ Love has no unit ... Is't it ? Keep loving infinitely ♥