"एके दिवशी सकाळी प्रेयसी, "कबुतर जा जा जा ....पहले प्यार कि पहली चिट्ठी साजन को दे आ " हे गाण म्हणत होती !!!
प्रियकर :- खरच आजही अस कबुतर पाठविता आलं तर काय मजा येईल ना !!
प्रेयसी :- ओह्ह खरच अस झालं तर तो माझ्या आयुष्यातील सर्वात Romantic क्षण असेल !! ( अस ती सहज बोलून गेली )
त्याच दिवशी संध्याकाली एक सुंदर पांढर कबुतर एक चिट्ठी घेऊन आलं, ..........
त्यात लिहिले होत, " असंच खर प्रेम करत रहा "
"कबुतर चिट्ठी घेऊन आलं" ह्यावर तिचा विश्वासच बसत नव्हता, तिने प्रियकराला फोन केला ...व त्याबद्दल आनंदाने विचारलं
प्रियकर :- काय ? झोपेत आहेस का ? स्वप्न पडले का ? अग कबुतराचा जमाना गेला ...स्वप्नातून बाहेर ये !!
प्रेयसी :- मी मजाक करत नाहीये इथे येऊन बघ !!
( प्रियकर तिथे येतो व बघतो....त्यावर त्याचाही विश्वास बसत नाही कि आजकालच्या जमान्यात अस कस झालं ? )
तेवड्यात तिथे ते पांढर कबुतर पुन्हा येत व त्या दोघांच्या हातात एक चिट्ठी देऊन जात !!
त्यात लिहिले असतं," माझेही तिच्यावर असंच जीवापाड प्रेम होत, पण घरच्यांनी मान्य केल नाही, हे सहन न होऊन बिचारीने आत्महत्या केली, आज मी मोहब्बते च्या शाहरुख खान सारख तिच्यासाठी सगळीकडे फिरत आहे, व प्रेम नेहमी जिवंत रहावे म्हणून तुमच्या सारख्या प्रेमी युगुलांना मदत करत आहे.....म्हणून पहिल्या चिट्ठीत "असंच खर प्रेम करत रहा" असे लिहिले !!- मी कोणी मानव नसून मी खरंच कबुतर आहे व हि माझी कहाणी आहे !!!
No comments:
Post a Comment