कधीतरी वाटते...
"ती"च्या समोर जाऊन फक्त उभे राहावे
मी आल्याचे तिला वर न पाहताच कळावे
मी आल्याचे तिला वर न पाहताच कळावे
शब्द नाही बोलू शकले ते, केवळ माझ्या सहवासाने व्यक्त व्हावे...
कधीतरी वाटते...
"ती"च्या बोलक्या डोळ्यात एकदाच प्रेमाने पहावे
"ती"च्या साठीच्या प्रेमाशिवाय "ति"ला त्यात काहीच न दिसावे
शब्द नाही बोलू शकले ते, नज्रेच्या त्या एका कटाक्षाने व्यक्त व्हावे...
कधीतरी वाटते...
कारण नसताना "ती"चा हात हातात घेऊन पाहावा
आयुष्यभर विनाकारण हात धरण्याची ती रंगीत तालीम असावी
आयुष्यभर विनाकारण हात धरण्याची ती रंगीत तालीम असावी
शब्द नाही बोलू शकले ते, केवळ त्या हाताच्या स्पर्शाने व्यक्त व्हावे...
कधीतरी वाटते...
"ती"ला एकदाच घट्ट मिठीत घ्यावे
त्या आलीन्ग्नाने "ती"लाही मोहरून यावे
शब्द नाही बोलू शकले, ते हृदयातील स्पन्दनानी व्यक्त व्हावे...
त्या आलीन्ग्नाने "ती"लाही मोहरून यावे
शब्द नाही बोलू शकले, ते हृदयातील स्पन्दनानी व्यक्त व्हावे...
कधीतरी वाटते...
"ती"ने नकळतच माझ्या खांद्यावर डोके ठेवावे
माझेही हाथ आपसूकच तिच्या केसात गुंतावे
शब्द नाही बोलू शकले, ते ह्या नकळत होणाऱ्या कृतीतून व्यक्त व्हावे...
माझेही हाथ आपसूकच तिच्या केसात गुंतावे
शब्द नाही बोलू शकले, ते ह्या नकळत होणाऱ्या कृतीतून व्यक्त व्हावे...
No comments:
Post a Comment