Monday, January 2, 2012

♥ कॉलेज मध्ये असताना गुलाबाचं फुल तू झाडावरून तोडलंस पण ते कुठेच न वापरता पुस्तका मध्ये ठेवून दिलंस, पुढे ते फुल तसंच पुस्तकामध्ये राहून गेलं ...........
त्याचवेळी माझ हृदय पण तू तोडलंस, ........... आणि ते देखील कुठेही न वापरता असंच पडून राहिलं ..... !!! :(
आज, वर्षानुवर्षे पुस्तकामध्ये ठेवलेला पण सुकून व कोमेजून गेलेला तो "गुलाब आणि मी" ह्यांमध्ये काहीही फरक राहिलेला नाहीये ................. आमच्या दोघांमधला सुगंध आता निघून गेला आहे पण दोघांच आस्तित्व मात्र अजूनही तुझ्या आयुष्यात एकाच छोट्या अपेक्षेने असंच पडून राहिलं आहे .......... तू येशील आणि पुस्तकाची (आयुष्याची) पाने चाळून बघशील !!! ♥

1 comment: