| कर्नाळा, माणिकगड, प्रबळगड, माथेरान, मोरगड, राजमाची, तिकोना, तोरणा, मुळशीचा जलाशय असा प्रचंड मुलुख या गडावरुन दिसतो. इतिहास ११ मार्च १८१८ रोजी कर्नल प्राथरने या किल्ल्यावर चढाई केली. तीन दिवस लढुन यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेले दारुकोठार व गडावरील प्राणहानी मुळे शरणागती पत्करली. कोराई देवीचे मंदिर गडाची देवता कोराई प्रसन्नवदनी, चतुर्भुजी, शस्त्रसज्ज आहे. देवीची मूर्ति दीड मीटर ऊंच आहे. गडावरील एकुण सहा तोफ़ांपैकी सगळ्यात मोठी तोफ लक्ष्मी मंदिराजवळ आहे. गणेश टाके गडावर दोन मोठी तळी आहेत. गडाच्या पश्चिम कडयाच्या उत्तर भागात काही छोट्या गुहा आहेत. ह्यालाच गणेश टाके म्हणतात. गडावर जाण्याच्या वाटा गडावर जायचे दोन मार्ग आहेत.उगवतीकडची राजवाट सोपी आहे तर आंबवण्याकडची वाट अवघड आहे. पुर्वेच्या वाटेने जायला घळीतून जावे लागते. अर्ध्या वाटेवर एक दुघई गुहा व श्री गणेशाची मुर्ती आहे. गणेश दरवाजातून आत गेल्यावर दोन तोफा दिसतात. लोण्यावळ्या पासून २५ कि. मी. वर शहापुरला खाजगी वाहनाने जाता येते. सुहास पवार .................... आवश्य बेत करा आणि जाऊन या |
Wednesday, May 18, 2011
किल्ले कोरीगड - कोराईगड
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment