दहशतवादाचा चटका बसलेल्या अनेक भारतीय कुटुंबापैकी एका कुटुंबातील लहान मुलाची हृदयस्पर्शी भावना
इयत्ता पाचवीचा वर्ग
शिक्षक :- अजय तू मोठा झाल्यावर काय बनणार ?
अजय :- मी अभियंता होऊन अमेरिकेत जाणार.
शिक्षक :- छान, विजय तू मोठा झाल्यावर काय बनणार?
विजय :- मी मोठा झाल्यावर माझ्या भारत देशासाठी शहीद होणार.
शिक्षक :- एवढ्याश्या वयात तू असा विचार कसा आणि का करतोस ?
विजय :- सर, योगायोगाने आमच्या घरात शहीद होण्याची परंपरा बनली आहे.
शिक्षक :- तुझ्या घरचे सर्व भारतीय सैन्यात होते का ?
विजय :- नाही.
शिक्षक :- मग शहीद होण्याची परंपरा असे का म्हणतोस ?
विजय :- सर माझे पंजोबा मुंबई मध्ये झालेल्या १९९३ च्या बॉम्बस्फोटात शहीद झाले.
माझे आजोबा २००६ च्या लोकल ट्रेन मधील बोंब स्फोटामध्ये शहीद झाले.
आणि माझे वडील ............ माझे वडील २००८ मधील मुंबई हल्ल्या मध्ये शहीद झाले.
हि तिघेही निरपराधी साधी माणसे होती, आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र कष्ट करत होती, तिघांच्या वेळेला आमचे जरा कुठे चांगले दिवस आले होते, तेवड्यात ते ह्या आतंकी हल्यात शहीद झाले. आता आम्हाला निरपराधी साधी माणसे असून सुद्धा शहीद होण्याची सवय झाली आहे सर.
No comments:
Post a Comment